आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जोधपूर - अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात आसाराम बापूसहित सर्व 5 आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. निकाल जज मधुसूदन शर्मा यांनी सुनावला. सन 2013 मध्ये आसारामच्या जवळचे राहिलेले वैद्य आणि त्यांच्या सहायकाने याबाबत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. तरीही दोषी ठरवल्यानंतर कोर्टाला तब्बल साडेचार वर्षांचा काळ लागला.
कोडवर्डमध्ये तरुणी सिलेक्ट करायचा आसाराम
- ऑगस्ट 2012 मध्ये झालेल्या 16 वर्षीय मुलीवर रेपचा खुलासा एका वर्षांनंतर 2013 मध्ये झाला होता.
- आसाराम बापूचे माजी सहयोगी महेंद्र चावला आणि त्याचे माजी वैद्य अमृत प्रजापतीने मीडियासमोर म्हटले होते की, बापू 7 कोडवर्ड्समधून आपल्या सेवेकऱ्यांना आणि मलंग महिलांशी (सिंधी शिष्या) बातचीत करायचा. या कोडवर्ड्सना समजून त्याचे सेवेकरी 12 ते 20 वर्षे वयाच्या मुलींना जाळ्यात अडकवायचे.
सहकाऱ्यालाही दिली होती जिवे मारण्याची धमकी
- माजी सहकारी महेंद्र चावला दीर्घकाळापासून आसाराम बापू आणि त्याचा मुलगा नारायण साईशी जोडलेला राहिला. त्यांनी टीव्ही चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की, "मला जानेवारी 2005 मध्ये कळले की, आश्रमात चुकीचे काम होत आहे. मी लगेच आश्रम सोडू शकत नव्हतो. मला नारायण स्वामीने धमकी दिली होती की, माझ्याविरुद्ध बाहेर जाऊन काहीही बोलशील तर तुला ठार मारू. माझ्याकडून 5 ब्लँक पेपरवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या, ज्या त्याने सुसाइड नोट म्हणून वापरण्याची धमकी दिली होती. मी ऑगस्ट 2005 मध्ये आश्रम सोडले होते, परंतु धमक्या मिळाल्याने 8 वर्षे गप्प राहिलो."
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, कोणत्या कोडवर्ड्सच्या माध्यमातून तरुणी सिलेक्ट करायचा आसाराम...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.