आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • दोषी ठरल्यानंतर कोर्टात रडला आसाराम, म्हणाला म्हातारा झालोय, काहीतरी दया करा! Asaram Convicted

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जन्मठेपेच्या शिक्षेनंतर कोर्टात ढसाढसा रडला आसाराम, म्हणाला- म्हातारा झालोय, दया करा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर/ शाहजहांपूर - अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषणप्रकरणी आसारामसहित 3 आरोपींना स्पेशल कोर्टाने दोषी ठरवले आहे. आसारामला आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून इतर दोन दोषींना 20-20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

> सूत्रांनुसार, शिक्षा सुनावताच आसाराम कोर्टात रडू लागला. त्याने म्हातारपणाचा दाखला देत दयेची भीक मागितली. म्हणाला- जजसाहेब म्हातारा झालोय, दया करा. तथापि, साडे चार वर्षांपासून जोधपूरच्या तुरुंगात जेलमध्ये आसाराम बंद असलेल्या आसारामवर जोधपुर तुरुंगात आपल्याच शिष्येवर लैंगिक शोषणाचा आरोप होता. ​पॉक्सो अॅक्टअंतर्गत हा पहिला मोठा निकाल आहे.

> निकालावरून केंद्रीय गृह मंत्रालयाने राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या राज्यांना कोणत्याही परिस्थिती हिंसा भडकू नये यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. या राज्यांत आसारामचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत.

 

आसारामशिवाय या 4 जणांवर हे होते आरोप

 

1. प्रमुख सेवादार शिवा ऊर्फ सवाराम 
काय होती भूमिका:
विद्यार्थिनीला शाहजहांपुराहून दिल्ली. मग दिल्लीतून जोधपुरला बोलावले. येथे मणाई आश्रमात आसारामला भेटण्याची व्यवस्था केली.

 

2. आश्रमातील स्वयंपाकी प्रकाश द्विवेदी 
काय होती भूमिका:
शरद, शिल्पी, शिवा आणि आसारामदरम्यान मीडिएटर बनला. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना जायला सांगून ती एकटी राहण्याची स्थिती निर्माण केली.

 

3. हॉस्टल वार्डन शिल्पी ऊर्फ संचिता गुप्ता
काय होती भूमिका:
भूत-प्रेताचे भय दाखवले. विद्यार्थिनीला फसवून आसारामकडे नेले.

 

4. हॉस्टल संचालक शरदचंद्र ऊर्फ शरतचंद्र
काय होती भूमिका:
आजार कळूनही उपचार केले नाहीत. पूर्ण रात्र अनुष्ठान करायला लावले. आसारामलाच एकमेव उपचारकर्ता मानण्यास मजबूर केले.

 

 

आसारामवर पीडितेने लावले हे आरोप?

- आसारामच्या गुरुकुलात शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने आपल्या जबाबात म्हटले की, तिला फिट्स यायचे. यावर गुरुकुलाच्या एका शिक्षिकेने माझ्या आईवडिलांना बोलावून माझ्यावर आसारामकडून उपचार करायला सांगितले. यानंतर तिच्या आई-वडिलांनी आसारामला भेटण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. शेवटी त्यांनी मला जोधपूरला नेण्यासाठी सांगितले.

- जोधपूरच्या जवळ मणाई गावातील फार्म हाऊसमध्ये मला बोलावण्यात आले. माझ्या आईवडिलांना बाहेर रोखण्यात आले. त्यांना सांगण्यात आले की, आसाराम विशेष पद्धतीने माझ्यावर उपचार करतील. यानंतर मला एका रूममध्ये पाठवण्यात आले. तेथे आसाराम आधीपासूनच हजर होता. त्याने माझ्यासोबत अश्लील कृत्य केले. सोबतच धमकी दिली की, ती जर ओरडली तर रूमबाहेर बसलेल्या तिच्या आईवडिलांना ठार केले जाईल. मला ओरल सेक्स करण्यासाठी सांगितले, परंतु मी नकार दिला.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे इन्फोग्राफिक्स...       

बातम्या आणखी आहेत...