आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कपूरथळा (जालंधर) - कपूरथळाच्या सुल्तानपूर लोधीमध्ये एका कथित बाबाविरुद्ध एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांत दाखल एफआयआरनुसार, बाबा महिलेवर बंदुकीच्या धाकावर 13 वर्षांपासून बलात्कार करत होता. आरोपी काँग्रेसी नगरसेवक प्रीतपालसिंह चिमा (55) आहे, त्याला परिसरात पालीबाबा म्हणून ओळखले जाते.
आरोपी बाबा जिवे मारण्याची द्यायचा धमकी...
पीडितेने सांगितले की, बाबा तिला आणि तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची आणि बलात्काराचा व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी बाबा फरार झाला आहे. बाबाजवळ अमेरिकेचा मल्टिपल एंट्री व्हिसा आहे. यामुळे आरोपी विदेशात पळून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, आरोपीला लवकरात लवकर अटक करू असा दावा पोलिसांनी केला आहे.
उपचारांच्या नावावर केले लैंगिक शोषण...
पीड़ितेने सांगितले की, ती नेहमी आजारी राहायची. उपचारांसाठी ती पालीबाबाकडे गेली असता त्याने तिच्यावर दुष्ट छाया असल्याचे सांगितले. तो उपचारांच्या नावे तिला दर सोमवारी आपल्या घरी बोलावू लागला. यादरम्यान बाबाने तिच्याशी छेडछाड सुरू केली. पीड़ितेने जेव्हा याची तक्रार बाबाची पत्नी अमरजित कौरला केली तेव्हा तिने आधी तिला मदत करते म्हणाली. परंतु बाबा जेव्हा तिला खोलीत बोलवायचा, तेव्हा अमरजित बाहेरून दार बंद करून घ्यायची. बाबाचे सोबती बलात्काराचा व्हिडिओ शूट करायचे. अत्याचाराचे हे सत्र तब्बल 13 वर्षे सुरू होते. बाबा धमकी द्यायचा की, जर ही बाब तू आपल्या कुटुंबात किंवा बाहेर कुणाला सांगितली तर तिच्या अख्ख्या कुटुंबाला ठार करीन किंवा खोट्या केसमध्ये अडकवीन. त्याने अशीही धमकी दिली की, जर तिने इतर कुणाशी लग्न केले, तर तो तिला तिथून उचलून आणीन. पीड़ितेने हेही सांगितले की, बाबाकडे अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे आहेत, ज्यात बंदूकही सामील आहे.
दुसरीकडे, पीड़ितेचा भाऊ म्हणाला की, त्याला 5 बहिणी आहेत. पीडिता त्याची सर्वात छोटी बहीण (36) आहे. 13 वर्षांपूर्वी अचानक तिची प्रकृती बिघडली. तेव्हा तो विदेशात होता. आई-वडिलांनी बहिणीवर अनेक ठिकाणी उपचार केले, परंतु फरक पडला नाही. मग कुणीतरी सुल्तानपूरच्या पालीबाबाच्या गैबी शक्तीबद्दल सांगितले. तेव्हा आईवडिलांनी बहिणीला बाबाकडे नेले.
पूर्वी अकाली दलात होता बाबा, 6 महिन्यांपूर्वी झाला काँग्रेसवासी
आरोपी प्रीतपालसिंह चिमा सुल्तानपूरमध्ये 3 वर्षांपासून नगरसेवक आहे. तो पूर्वी शिरोमणी अकाली दलाचा समर्थक होता. यानंतर 6 महिन्यांपूर्वीच त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याला 3 मुलेही आहेत. पैकी दोघांचे लग्न झालेले आहे आणि लहान मुलीचे लग्न व्हायचे आहे.
धरणे दिल्यावर दाखल झाला गुन्हा
नगरसेवक प्रीतपालसिंह काँग्रेस आमदार नवतेजसिंह चिमा यांचा जवळचा नातेवाईक आहे. पोलिसांना पीडित कुटुंबाने 16 एप्रिल रोजी तक्रार दिली होती, परंतु पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. यामुळे कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनबाहेर धरणे दिले. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी बाबा सध्या फरार आहे.
पुढच्या स्लाइड्सवर, इन्फोग्राफिकमधून जाणून घ्या हे प्रकरण...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.