आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंटिस्टने IPS बनून केले 60 एन्काउंटर, यांना पाहताच मोठमोठ्या गुंडांना फुटतो घाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा - एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून चर्चेत आलेले नोएडाच नवनियुक्त SSP डॉ. अजयपाल यांनी पहिल्याच बैठकीत गुंडांच्या मुसक्या आवळणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, गुंडांना नोएडाच्या हद्दीत जागा असणार नाही. पोलिस असे अॅक्टिव्ह राहतील की, गुंडांना संधीच मिळणार नाही. 


तोच ठाणेदार राहील ज्यांचा इंटरेस्ट क्राइम कंट्रोलमध्ये, बाकीच्यांना हटवणार
- मंगळवारी दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी सांगितले की, क्राइम कंट्रोल करण्यासाठी इंटरेस्ट असणारे ठाणेदारच टिकतील. जर कुणाचा आणखी काही इंटरेस्ट असेल तर त्यांना हटवण्यासाठी वेळ नाही लागणार. 
- सोमवारी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी रात्री सर्व ठाणेदारांसोबत मीटिंगमध्ये म्हटले की, जर गुन्हेगार एखाद्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा करत असेल तर त्याचा तपास करणे ठाणेदाराची प्राथमिकता असेल. त्याच गुंडाने पुन्हा त्याच एरियात जर गुन्हा केला तर ती त्या पोलिस स्टेशन इंचार्जची लापरवाही मानली जाईल.

 

एन्काउंटरनेच कमी होईल नोएडामधील क्राइम
2011 बॅचचे आयपीएस अधिकारी डॉ. अजयपाल यांनी 6 वर्षांच्या करिअरमध्ये 60 हून अधिक एन्काउंटर केलेले आहेत. त्यांनी म्हटले की, एन्काउंटर झाल्याने नोएडातील क्राइम कमी होईल. शहरात गुन्हा करताना एखादा गुंड पकडला गेला आणि त्याने फायरिंग केली, तर पोलिस त्याचे चोख प्रत्युत्तर देतीलच. 

 

डेंटिस्ट्री सोडून IPS बनले अजयपाल
- अजयपाल 2011 बॅचच IPS आहेत. मूळचे लुधियानाचे रहिवासी अजय यांनी स्टेट मॅट्रिक एक्जाममध्ये 100 टक्के गुण मिळवले होते.
- इंटरमीडिएटनंतर त्यांनी बीडीएस केले. डिग्री कम्प्लीट केल्यानंतर त्यांनी पंजाब सरकारच्या डेंट्सप्लाय प्रॉजेक्टमध्ये इंटर्नशिप केली. यादरम्यान त्यांनी सिविल सर्विसेस एक्झाम देण्याचे ठरवले.
- दोन वर्षांच्या मेहनतीनंतर सेकंड अटेम्प्टमध्ये त्यांचे सिलेक्शन IPS साठी झाले. त्यांनी LIC मध्ये जॉब करत असताना यूपीएससी एक्झाम क्लीअर केली होती.
- 2010 च्या यूपीएससी एक्झाममध्ये 160व्या रँकसोबत त्यांना IPS मिळाले.

 

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, हे दमदार IPS, ज्यांनी केलेले आहेत 50+ एन्काउंटर...