आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • या 10 पैकी एखादा गुन्हा केल्यास तुम्हाला होऊ शकते फाशी Facts About The Death Penalty India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या 10 पैकी एखादा गुन्हा केल्यास तुम्हाला होऊ शकते फाशी, जाणून घ्या, कायद्याची माहिती...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉलेज डेस्क - मोदी सरकारने पॉक्सो अॅक्टमध्ये संशोधनावरून आणलेल्या अध्यादेशाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. नव्या अध्यादेशानुसार, 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर दुष्कर्म करणाऱ्यांना मृत्युदंड ठोठावला जाईल. 16 पेक्षा कमी वयात मुलीवर रेप करणाऱ्यांना दिली जाणारी कमीत कमी शिक्षा 10 वर्षांपेक्षा वाढवून 20 वर्षे करण्यात आली आहे.

> ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा एखाद्या गुन्ह्यात मृत्युदंडाची तरतूद करण्यात आली असेल. असे अनेक गुन्हे आहेत ज्यांच्यासाइी मृत्युदंडाची तरतूद आहे. हायकोर्ट अॅडव्होकेट संजय मेहरा म्हणाले की, मर्डर करणाऱ्या दोषी व्यक्तीला बहुतांश कोर्ट जन्मठेपेची शिक्षा सुनावतात, परंतु प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर असेल तर फाशीची शिक्षाही दिली जाते. तथापि, अशा प्रकरणात कोर्ट दोषीला फाशीची शिक्षा तेव्हाच सुनावते जेव्हा परिस्थिती, फॅक्ट्स आणि केसच्या आधारे असे करणे जरूरी असेल.

 

शिक्षा सुनावल्यानंतरही फाशी होईलच असे नाही 
> भारताने यूएनच्या रिझॉल्यूशनच्या विरुद्ध मतदान केले होते, ज्यात फाशीच्या शिक्षेवर रोख लावण्याविषयी सांगण्यात आले होते. तथापि, भारतात जेवढ्या गुन्हेगारांना आतापर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यापैकी अनेकांना फाशी मिळाली नाही.

> अॅम्नेस्टी इंटरनॅशनलनुसार, भारतात 2007 मध्ये 100, 2006 मध्ये 40, 2005 मध्ये 77, 2002 मध्ये 23 आणि 2001 मध्ये 33 दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, परंतु त्या सर्वांना फाशी झाली नाही. भारताच्या तुलनेत चीन, इराण, सौदी अरब, अमेरिका आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्ये फाशीच्या शिक्षेची कडक अंमलबजावणी होते.

> आकडेवारीनुसार, 2001 ते 2011 दरम्यान 1455 दोषींना मृत्युदंड देण्यात आला, परंतु सर्वसाधारणपणे दरवर्षी 132 दोषींना डेथपेनाल्टी मिळाली, परंतु यात बहुतांश जणांची शिक्षा जन्मठेपेत बदलली. या पीरियडमध्ये फक्त 14 वर्षीय बालिकेवर कोलकात्यात रेप करणाऱ्या धनंजॉय चटर्जी (2004) याला फासावर लटकावण्यात आले. 1995 नंतर ही दुसरी वेळ होती.

> 27 एप्रिल 1995 रोजी सीरियल किलर शंकरला सुळावर लटकावण्यात आले होते. यानंतर फक्त 3 दोषींना फाशी झाली. यात मुंबईवर हल्ला करणारा अजमल कसाब, संसदेवर हल्ला करणारा अफझल गुरू आणि मुंबई सीरियर ब्लास्ट केसचा दोषी याकूब मेमनचे नाव आहे.

 

या 10 पैकी एखादा गुन्हा केल्यास तुम्हाला होऊ शकते फाशी, पाहा पुढच्या स्लाइड्सवर...  

बातम्या आणखी आहेत...