आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेला संबंधासाठी मजबूर करायचा सासरा, म्हणायचा - मी खर्च उचलतो, माझी 'इच्छा' पूर्ण करावीच लागेल..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनेने शूट केलेल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट. - Divya Marathi
सुनेने शूट केलेल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट.

जमशेदपूर - टेल्को मनीफीटमध्ये भंगार व्यावसायिकाचे काम कारणाऱ्या सासऱ्याने आपल्या सुनेवर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत होता. नेहमी संधी मिळताच सुनेशी अश्लील चाळे करत होता. त्रस्त होऊन सुनेने त्याचा बलात्काराचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ बनवला आणि पोलिसांना सोपवला. व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. पीडितेच्या माहेरच्यांनी सासऱ्याला कडक शिक्षेची मागणी करत पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. 

 

असे आहे प्रकरण...
- पोलिसांना सोमवारी पीडित विवाहितेचे वडील म्हणाले, सासरा ओमप्रकाश जायसवाल अनेक दिवसांपासून तिच्यावर वाईट नजर ठेवून होता. तो तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करत होता. यामुळेच शेवटी त्रस्त होऊन ती आपल्या माहेरी भिलाई (छत्तीसगढ़) मध्ये राहू लागली होती.
- काही दिवसांपूर्वीच समज घालून तिला पाठवले, आम्हाला वाटले होते की, सासऱ्याला आता तरी थोडी अक्कल आली असेल. पण असे झाले नाही. 
- होळीपासून तो माझ्या मुलीला रंग लावण्याच्या बहाण्याने पुन्हा छेडू लागला. मग शेवटी त्रस्त होऊन तिने आपल्या सासऱ्याचा कुकर्म करतानाचा व्हिडिओ शूट केला.
- व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये किचनमध्ये स्वयंपाक करणाऱ्या आपल्या सुनेला सासरा बळजबरी मिठीत घेताना दिसत आहे. शिवाय तिच्यासोबत अश्लील चाळे करतानाही दिसतो.
- यादरम्यान सुन स्वत:ची सुटका करण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसते. तिने शूट केलेला व्हिडिओ सर्वात आधी आपल्या माहेरच्यांना पाठवला. 
- व्हिडिओ पाहताच आईवडील व भावाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी ताबडतोब तिच्या घराकडे धाव घेतली. येथे येताच त्यांनी टेल्को पोलिस स्टेशन गाठून व्हिडिओ पोलिसांना सोपवला व तक्रार नोंदवली.

 

पीडिता म्हणाली- मी त्यांना खूप समजावले, पण ऐकले नाही म्हणून व्हिडिओ केला शूट
-पीडिताने सांगितले की, माझे पती अभिषेक सासऱ्याचे काम सांभाळतात. आमचे लग्न जानेवारी 2014 मध्ये झाले होते. आम्हाला 3 वर्षांचा मुलगाही आहे. खूप दिवसांपासून सासऱ्याची माझ्यावर वाईट नजर होती. तो नेहमी माझ्यासोबत अश्लील चाळे करत होता, अनेक वेळा त्याने अतिशय घाणेरडी छेडछाड काढली. मी त्याचा जिवाच्या आकांताने विरोध केला.
- सासरा म्हणायचा की, मी तुझा खर्च उचलतो. तुला माझ्या इच्छा पूर्ण कराव्याच लागतील. तो माझ्याशी बोलताना अश्लील शब्दांचा वापर करायचा. माझे पती कामासाठी घराबाहेर पडले की, सासरा जबरदस्ती करायचा.
- मी सासऱ्याच्या अशा कृत्यांमुळे त्रस्त होऊन याची माहिती माहेरच्यांना दिली. आणि एका दिवशी त्याचे सगळे चाळे मोबाइल कॅमेऱ्यामध्ये पुरावा म्हणून रेकॉर्ड केले. तो किचनमध्ये मी स्वयंपाक करतानाही जबरदस्ती करायचा. माझी सासू आजारी असते, ती वरच्या खोली राहते, खाली येत नाही.
- स्थानिक नागरिक म्हणाले की, ती सासऱ्याचे चाळे सहन करत राहिली, पण जेव्हा डोक्याच्या वर पाणी गेले तेव्हा तिला हे पाऊल उचलावे लागले. आता मला या घरात पाऊलही ठेवायचे नाही, असे सून म्हणाली. घरात काम करणाऱ्या मोलकरणीवरही सासरा बळजबरी करायचा.

 

आरोपीने तोडले अकलेचे तारे.. म्हणाला- मिठीत घेणे आणि प्रेम करणे चुकीचे नाही
- आरोपी ओमप्रकाश जायसवाल म्हणाला, मला फसवले गेले आहे. मी माझ्या सुनेवर प्रेम करतो. प्रेम करणे काही गुन्हा नाही. 
- कट रचून हा व्हिडिओ बनवला आहे. मी सुनेला मुलीप्रमाणे मानायचो. मी तर व्हॉट्सअॅपवर फक्त तिची ख्यालीखुशाली विचारायचो.
- तिला चांगले कपडे घालण्याचा सल्ला द्यायचो. सुनेला मिठीत घेणे चुकीचे नाही.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...