आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊ - 19 वर्षीय स्टुडंट गौरी घरातून वडिलांचे कपडे लाँड्रीत देण्यासाठी निघाली होती, पण घरी परतीलच नाही. त्याच दिवशी संध्याकाळी यूपी पोलिसांना तिचा मृतदेह तुकड्यांमध्ये मिळाला. दोन वर्षापूर्वी झालेल्या या खुनामुळे पूर्ण यूपीच हादरून गेली होती. divyamarathi.com आपल्या क्राइम सिरीजमध्ये गौरी मर्डर केसचा डिटेल पंचनामा देत आहे.
स्टोरी
- तारीख 1 फेब्रुवारी 2015. लखनऊच्या गणेशगंजमध्ये राहणारी 19 वर्षांची गौरी श्रीवास्तव आईला म्हणाली, मी पप्पांचा सूट लाँड्रीत नेऊन देते. मग मित्रांसह शॉपिंग करायला जाणार आहे. आई म्हणाली, लवकर घरी ये.
- त्याच दिवशी संध्याकाळचे 6 वाजले तरी गौरी घरी परत येत नाही. काळजीत पडलेली आई तिच्या पप्पांशी बोलते. आईवडील गौरीच्या मोबाइलवर कॉल करतात. फोन स्विच ऑफ येतो. तरीही ते लगातार मुलीचा फोन ट्राय करतात. शेवटी एकदाचा तिचा फोन लागतो.
- दुसऱ्या बाजूने गौरीऐवजी एक मुलगा फोन उचलतो. मुलीचे पप्पा म्हणतात, मुलीला फोन दे. तो म्हणतो- गौरीची तब्येत खराब आहे. तिला पीजीआय हॉस्पिटलमध्ये नेत आहोत. तुम्हीही लवकर पोहोचा.
- मुलीच्या तब्येतीबाबत ऐकून आईवडील घाबरतात. दोघेही लगेच रुग्णालयात पोहोचतात. पण तिथे ना मुलगी दिसते ना फोन उचलणारा मुलगा.
- गौरीचे पप्पा तत्काळ लखनऊ पोलिसांना मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी मिळाले मृतदेहाचे तुकडे
- 2 फेब्रुवारी 2015 च्या सकाळी पोलिसांना एका गोणीत मुलीचे कापलेले पाय आढळल्याची खबर मिळते३ पोलिस स्पॉटवर पोहोचतात, तर शहराच्या आणखी एका भागातून कटलेला मृतदेह आढळल्याची खबर येऊन धडकते. 3 तासांत 6 ठिकाणांहून एकाच मृतदेहाचे वेगवेगळे बॉडी पार्ट्स मिळतात.
- मुंडके आढळल्यावर पोलिस गौरीच्या आईवडिलांना मॉर्च्युरीमध्ये बोलावतात. आई मुलीचे शिर पाहून काळीज पिळवटून टाकणारा आकांत करते.
- आता पोलिस त्या मुलाला शोधायला लागतात, ज्याने गौरीच्या वडिलांशी फोनवर बातचीत केली होती.
CCTV तून लागला सुगावा
- गणेशगंजच्या लाँड्री शॉपजवळ लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून पोलिस गौरीचे डिटेल्स काढतात.
- फुटेजमध्ये गौरी एक हेल्मेट आणि जॅकेट घातलेल्या युवकासोबत बाइकवर बसून जाताना दिसते.
- मुलाला शोधण्यासाठी पोलिस गौरीचे कॉल डिटेल्स मागवतात. यावरून जिथून डेडबॉडीचे तुकडे मिळतात, तीच लोकेशन ट्रेस होते.
- मग पोलिस दबा धरून हिमांशू प्रजापती नावाच्या मुलाला पकडतात. त्याच्याकडे तेच हेल्मेट आणि जॅकेट आढळते, जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या बाइकस्वाराने पाहिले होते. सोबतच त्याच्याकडे एक करवतही आढळते.
- पोलिस त्याची कडक चौकशी करताच तो गुन्हा कबूल करून सगळी हकिगत मांडतो.
प्रकरणाचे करंट स्टेटस
- गौरीचे वडील शिशिर श्रीवास्तव म्हणाले, ''माझी मुलगी वारून दोन वर्षे झाली आहेत. पोलिसांनी सुरुवातीला वेगाने तपास करून चार्जशीट दाखल केली होती. परंतु, अजूनही त्या राक्षसाला शिक्षा झालेली नाही. कोर्टात खटला सुरू आहे. वकील म्हणतात, सर्व साक्षीदार तपासले आहेत. खटल्यात लवकरच सुनावणी होईल आणि हिमांशूला शिक्षा होईल.''
पुढे इन्फोग्राफिकमध्ये वाचा, खुन्याचा मैत्रीपासून ते मर्डनपर्यंतचा कबूलनामा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.