आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणीने केले एवढे भयंकर कृत्य, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीधाम (अहमदाबाद) - जिल्हा न्यायालयाचे अॅडिशनल जज यांनी एका प्रकरणात 19 वर्षीय तरुणीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तरुणीवर आपल्या आई व बहिणीची हत्या केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, याच प्रकरणात तरुणीच्या बहिणीला 5 वर्षांची शिक्षा सुनावली. घरातील कामावरून आईने तिला रागावले होते. यानंतर चिडून तरुणीने एवढे क्रूर कृत्य केले होते. गुजरातेत महिलेला फाशी शिक्षा देण्याचे हे पहिले प्रकरण आहे.

 

दुहेरी हत्येची आरोपी आहे तरुणी... 
- कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम शहरातील तरुणीने एका वर्षापूर्वी आई रागावली म्हणून आपली आई आणि बहिणीची तलवारीचे वार करून हत्या केली होती. याप्रकरणी कोर्टाने तरुणीला गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली.

- अॅडिशनल जज डी.आर. भट्ट यांच्या कोर्टाने नवी सुंदरीपुरीची रहिवासी 19 वर्षीय मंजू नावाच्या तरुणीला दुहेरी हत्येसाठी फाशीची शिक्षा, तसेच तिच्या दुसऱ्या बहिणीलाही जीवघेणा हल्ला करण्यासाठी 5 वर्षे कैदेची शिक्षा ठोठावली.
- वास्तविक, मंजूने गतवर्षी 17 फेब्रुवारीच्या सकाळी घरात झोपलेली आपली आई राजीबेन (60) आणि बहीण आरती (27) यांची निर्घृण हत्या केली होती. दुसरीकडे, आणखी एक बहीण मधूला जखमी केले होते. याआधी तिच्या आईने घरातील कामावरून तिला रागावले होते आणि शिवीगाळ केल्यामुळे तिला थापडही मारली होती. भांडणानंतर मंजूने प्रतिवाद केला नाही, पण सकाळी झोपेत असलेली आई आणि बहिणीवर तलवारीने हल्ला चढवला होता.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे इन्फोग्राफिक्स...

बातम्या आणखी आहेत...