आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्याचा भाच्यावर जडला जीव...ती 4 महिन्यांची प्रेग्नेंट झाल्यानंतर त्याने रचले असे षडयंत्र!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनौर (यूपी)- आत्या व भाच्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. अवैध संबंधातून भाच्याने आत्याची निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी काल (सोमवार) आरोपीच्या हातात बेड्या ठोकल्या. कमलजीत असे आरोपीचे नाव आहे.

 

"कामिनी कौर (नाव बदलले आहे) आणि त्याचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांमध्ये चूकून शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याने कामिनी प्रेग्नेंट झाली. 'विवाह कर', असा तिने कमलजीतकडे सारखा तगादा लावला. त्यामुळे त्रस्त झालेल्या कामिनीला विष पाजून संपवले.'', असे आरोपीने पोलिसांनी सांगितले. 

 

काय आहे हे प्रकरण..?
- ही घटना उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील रेहड येथील आहे. कामिनी (आत्या) हिला कमलजीतवर (भाचा) जीव जडला होता.  
- दोघांमध्ये शरीर संबंध प्रस्थापित झाले. त्यातच कामिनीला दिवस गेले. नंतर तिने मागील काही‍ दिवसांपासून कमलजीतकडे विवाहासाठी तगादा लावला होता.

 

कमलजीत याने असे रचले षडयंत्र...
- आपण दोघांमध्ये आत्या-भाचाचे नाते आहे. आपला विवाह होऊ शकत नाही, असे कमलजीत याने कामिनीला सांगितले. परंतु ती ऐकायला तयार नव्हती. त्याने तिला दिलासा देत सांगितले की, 'मग आपण सुसाइड करू'
- कमलजीत तिला घरी घेऊन गेला. त्याने विष आणले. तो म्हणाला, आधी तू विष प्राशन कर, त्यानंतर मी करेन.
-  कामिनीने विष प्राशन केल्यानंतर ती बेशुद्ध झाली. कमलजीत याने कामिनीचा चेहरा रुमालाने घट्ट बांधून तिची हत्या केली.
- एवढेच नाही तर तो तिचा मृतदेह त्याने जंगलात फेकून फरार झाला.

 

काय म्हणाले पोलिस...
- देहात पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजीत श्रीवास्तव यांनी सांगितले की, 3 दिवसांपूर्वी कामिनीचा मृतदेह जीम कार्बेट नॅशनल पार्कजवळ आढळून आला.
- पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याने गुन्हा कबूल केला असून त्याची रवानगी तुरुंगात करण्‍यात आली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...