आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅक्सनंतर 18 लाखांचे बिल दिलेल्या फोर्टिस हॉस्पिटलला दणका, जमिनीचे लीज केली रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जीवंत नवजात अर्भकाला बेजबाबदारपणे मृत घोषित करणाऱ्या मॅक्स हॉस्पिटल विरोधात दिल्ली सरकारने परवाना रद्द करण्याची कारवाई शुक्रवारी केली. त्यापाठोपाठ आणखी एका हॉस्पिटलला दणका मिळाला आहे. हरियाणा सरकारने फोर्टिस रुग्णालयाच्या जमिनीची लीज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. फोर्टिस रुग्णालयाने एका चिमुरडीवरील डेंग्यूच्या उपचारासाठी 18 लाखांचे बिल दिले होते. त्या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. 

 

हरियाणाच्या गुडगाव येथील फोर्टिस रुग्णालयावर आता सहेतुक हत्या करणे व सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. हरियाणाच्या आरोग्य विभागाने गुडगावच्या पोलिस उपायुक्तांना पत्र लिहून एफआयआर नोंदवण्यास सांगितले आहे. या रुग्णालयाने काही दिवसापूर्वी डेंग्यूमुळे एका मुलीचा मृत्यू झाल्यानंतर पालकांकडे १६ लाखांचे बिल दिले होते. यामुळे वाद निर्माण झाला होता.  


शनिवारी हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी फोर्टिस रुग्णालयाच्या जमिनीचा करार रद्द करण्यासंबंधीचे पत्र लिहिले.  त्यांनी  अन्न व औषधी प्रशासनास पत्र लिहून रुग्णालयातील रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले. आरोग्यमंत्र्यांनी चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर ही कारवाई केली, असे सांगण्यात आले. प्रकरण घडल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. समितीने दिलेल्या अहवालात रुग्णालयात घोटाळे व सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचे नमूद केले होते. चौकशी समितीचा अहवाल 
रुग्णालय व्यवस्थापन व मुलीच्या वडिलास देण्यात आला आहे.


ब्लड बँकेचा परवाना रद्द करण्याची नोटिस 
अनिल विज यांनी हरियाणआ अर्बन अथॉरिटीला पत्र लिहून फोर्टिस रुग्णालयाच्या जमिनीची लीज रद्द करण्याचा आदेश दिला आहे. हॉस्पिटलच्या गुन्हा दाखल करण्याबरोबरच ब्लड बँकेचे लायसन्स रद्द करण्याची नोटिसही जारी केली आहे.  


रुग्णालयांचा बेजबाबदारपणा धोकादायक 
अनिल विज म्हणाले कीस लोक आता खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट आणि दबावाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. रुग्णालयांनी बेजबाबदारपणामध्ये सुधारणा आणणे गरजेचे आहे. 


डेंग्यूच्या उपचारासाठी दिलेल्या 18 लाखांच्या बिलाचा तपशील पुढील स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...