आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी बाबा रामदेव सायकलवर विकायचे जडी-बुटी, वाचा कशी उभी केली अब्जावधींची कंपनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानिपत/नारनौल - कधीकाळी सायकलवर जड़ी-बूटी विकणारे जगप्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलि आयुर्वेद कंपनीने ई-कॉमर्स (ऑनलाइन) कंपन्यांसोबत करार करून ऑनलाइन मार्केटमध्ये एंट्री केली आहे. आता पतंजलिचे सर्व प्रॉडक्ट्स पेटीएम मॉल, बि‍ग बास्‍केट, फ्लि‍पकार्ट, ग्रोफर्स, अॅमेझॉन, नेटमेड्ड, 1 एमजी, शॉपक्‍लूज आणि इतर वेबसाइट्सवरही उपलब्ध होतील. कंपनी आतापर्यंत आपली वेबसाइट पतंजलि आयुर्वेद डॉट नेटवर आपली उत्पादने ऑनलाइन विकत होती. याशिवाय त्यांचे काही प्रोडक्ट इतर विक्रेत्यांमार्फतही ऑनलाइन उपलब्ध होते. पतंजलिचा दावा आहे कि, त्यांनी 50 हजार कोटींची उत्पादन क्षमता बनवून देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. 

 

वाचा... कशी गुरुकुलातून सुरुवात करून 50 हजार कोटींपर्यंत पोहोचले बाबा रामदेव...

- बाबा रामदेव यांचा जन्म हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील सैद अलीपुर गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामनिवास आणि आईचे नाव गुलाब देवी आहे.
- त्यांच्या गावातील सरपंच देशपाल म्हणाले की, रामदेव यांना चार बहीणभाऊ आहेत. त्यांचे मोठे भाऊ देवदत्त आहेत, जे लष्करातून निवृत्त झाले आणि आता गावातच राहून शेती करतात.
- रामदेव दुसऱ्या क्रमांकाचे. त्यांच्याहून लहान भाऊ रामभरत आहेत. ते रामदेव यांच्यासोबत पतंजलिमध्ये पूर्ण कामकाज पाहतात. 
- त्यांना एक बहीण- ऋतंभरा आहे. मोठ्या भावाला सोडून पूर्ण कुटुंब हरिद्वार पतंजलिमध्येच राहते.

 

घरातून पळून गुरुकुलात पोहोचले रामदेव...  
- गुरुकुलातील शिक्षण ग्रहण करण्यासाठी रामदेव घरातून पळून गेले आणि अनेक गुरुकुलांचे दार ठोठावले, परंतु त्यांना तेथे प्रवेश मिळाला नाही. 
- शेवटी ते हरियाणाच्या खानपूर गुरुकुलात आले जेथे त्यांनी गुरुकुल शिक्षण पद्धतीने शिक्षण घेतले. त्यांचे वडील त्यांना शोधत गुरुकुलात पोहोचले तेव्हा त्यांनी परत जाण्यासाठी नकार दिला.

 

1990 मध्ये आचार्य बालकृष्ण भेटले आणि मग झाली मैत्री...
- 1990 मध्ये बाबा रामदेव यांची भेट आचार्य बालकृष्ण यांच्याशी झाली.
- येथे दोघांमध्ये मैत्री झाली. गुरुकुलातून शिक्षण ग्रहण केल्यानंतर दोघांनी हिमालयात योग आणि आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त केले.

 

कृपालु आश्रम कनखल मध्ये 1994 ला केली सुरुवात
- हरिद्वारच्या कृपालु आश्रमात 10 नोव्हेंबर 1994 रोजी बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांनी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. 

- येथे ते योग शिबिर घेऊ लागले आणि आयुर्वेदिक पद्धतीने लोकांवर मोफत उपचारही करू लागले.
- एका धार्मिक टीव्ही वाहिनीने त्यांच्या योगवरील कार्यक्रमात बाबा रामदेव यांना घेणे सुरू केल्यावर त्यांना देशातल्या घराघरात ओळखले जाऊ लागले.
- 2006 मध्ये पतंजली आयुर्वेदची हरिद्वारमध्ये स्थापना करण्यात आली.
- आज त्यांचा हा ब्रँड 50 हजार कोटीं उत्पादन क्षमतेपर्यंत पोहोचला आहे.  

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बाबा रामदेव यांच्याशी संबंधित फॅक्ट्स व फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...