आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • पत्नीकडून छळ झाल्यास हे आहेत पतीचे अधिकार How Can Men Legally Protect Themselves From Women Misusing

एखाद्या पतीचा पत्नीकडून झाला छळ, तर हे आहेत पतीचे अधिकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - ग्रेटर नोएडाच्या दनकौन परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीपासून वाचवण्यासाठी तक्रार दाखल केली. रडतच पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या व्यक्तीन पोलिसांकडे न्यायाची मागणी करत म्हटले की, साहेब, माझी पत्नी माझ्याकडून घरातील कामे करवून घेते. कपडे धुवून घेते. जेवण बनवायला लावते आणि फरशीही पुसायला लावते. तिला नकार दिल्यावर ती हुंड्यासाठी छळाच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देते. यामुळे त्रस्त होऊन मला नोकरीही सोडावी लागली.

हे प्रकरण नुकतेच समोर आले. परंतु यापूर्वी अशा प्रकारची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत, ज्यात पत्नींनी पतीला खोट्या हुंड्यासाठी छळाच्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. येथे जर पत्नीकडून असे काही झाल्यास पतीकडे कोणते पर्याय असतात याबाबत सांगत आहोत. हायकोर्ट अॅडव्होकेट संजय मेहरा म्हणाले की, पत्नीप्रमाणेच पतीसाठी कोणतीही विशेष तरतूद कायद्यात नाही. परंतु कायद्यात असे काही पर्याय जरूर आहेत, ज्यामुळे पती अशा पत्नींपासून सुटका करून घेऊ शकतो.

 

छळामुळे असतो घटस्फोटाचा अधिकार
जर एखाद्या पतीचा पत्नी शारीरिक वा मानसिक छळ करत असेल, तर पती या आधारे तिला घटस्फोट मागू शकतो. परंतु पतीला कोर्टात हे सिद्ध करावे लागेल की, त्याची पत्नी त्याचा छळ करत आहे. अशा वेळी कोणत्याही पतीला आधी पोलिस तक्रार करणे आवश्यक आहे, कारण ही तक्रार नंतर कोर्टात स्वत:चे म्हणणे सिद्ध करण्याचे काम करते.

 

पोलिस थेट अटक करू शकत नाही, पाहा पुढच्या स्लाइड्सवर...  

बातम्या आणखी आहेत...