आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिलाँग - मेघालयात विधानसभा निवडणुकीत इटली, अर्जेंटिना, स्वीडन आणि इंडोनेशियाही मतदान करून आपला आमदार निवडणार आहेत. तुम्ही विचार करत असाल की, या विधानसभा निवडणुकीत हे देश का बरे मतदान करतील? वास्तविक, मेघालयातील खासी हिल्स जिल्ह्यात शेला मतदानसंघातील उमनिउ-तमर एलाका गावात इटली, अर्जेंटिना, स्वीडन आणि इंडोनेशिया या नावाचे लोक राहतात. एवढेच नाही, या निवडणुकीत प्रॉमिसलँड आणि होलीलँड नावाच्या बहिणी तसेच त्यांच्या शेजारी येरूशलमही सहभागी होणार आहेत.
नावांचा अर्थही नाही माहिती...
- एलाकाचे प्रमुख प्रीमियर सिंह म्हणाले, "मेघालयात अनेक छोट्या-छोट्या गावांत अनेक लोक असे भेटतील ज्यांची नावे ऐकून तुम्ही तासनतास हसत राहाल."
- "येथील 50% लोक इंग्रजी शब्दांचे शौकीन आहेत. ते आपल्या नावांमध्ये अशा इंग्रजी शब्दांचा वापर करतात जे ऐकायला चांगले वाटतात. परंतु त्यांचा अर्थही त्यांना माहिती नाही."
- "मेघालयाचा बांगलादेश सीमेला लागून असलेला एलाकाही यापैकीच एक आहे. येथील 850 पुरुष आणि 916 महिला रजिस्टर्ड मतदार आहेत, परंतु येथे तुम्हाला अनेक चित्रविचित्र नावे ऐकायला मिळतील.
- प्रीमियर सिंह सांगतात, ते खूप नशीबवान आहेत की त्यांचे वडील शिकलेले होते आणि त्यांनी जे नाव दिले ते त्यांच्या पदासाठी (एलाका चीफ) एकदम योग्य आहे.
दिवस-वार, राज्यांच्या नावावर आहेत मतदारांची नावे...
- प्रीमियर सिंह म्हणाले की, गावातील बहुतांश लोक साक्षर नाहीत, परंतु तरीही ते स्मार्ट आहेत. येथे तुम्हाला अनेकांची नावे संडे, थर्सडे अशीही ऐकायला मिळतील. येथे तर नावे म्हणून देशातील राज्ये उदा. त्रिपुरा, गोवाही ऐकायला मिळतात.
- "येथे नावे म्हणून भारत, मुमताज, दुर्गा, नेहरू सूटिंग, नेहरू संगमा, गुडनेस आणि युनिटीही ठेवली जातात."
हे नावही आहे सर्वात खास
- 30 वर्षीय 12वी पास स्वेटर नावाच्या महिलेने आपल्या मुलीचे नाव ठेवले आहे- आय हॅव बीन डिलिव्हर्ड (मी हिला जन्म दिला).
- परिसरातील लोकांनी टेबल, ग्लोब, पेपर अशा दैनंदिन वस्तूंची नावे ठेवली आहेत. सोबतच प्लेनेट्स-ओशनवर व्हीनस, सॅटर्न, अरेबियन-सी, पॅसिफिक आणि महाद्वीपांचेही नावे ऐकायला मिळतात.
- शूकी नावाच्या महिलेने आपल्या तीन मुलींची नावे रिक्वेस्ट, लव्हलीनेस आणि हॅपीनेस अशी ठेवली आहेत.
- कॉलम्निस्ट एच.एच. मोहरमॅन यांच्या मते, "अनेक जागी लोकांना त्यांच्या मुलांच्या नावाचा अर्थही माहिती नसतो. पण अशा नावांमुळे पुढे चालून मुलांना लाज वाटायला लागते तेव्हा याचे दु:ख वाटू लागते." पण म्हणतात नावात काय आहे? तशीच काहीशी स्थिती येथील मतदारराजाची आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, मेघालयातील मतदारराजाच्या नावांबद्दलची इन्फोग्राफिक माहिती...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.