आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लखनऊ - उत्तर प्रदेशमधून चौथ्यांदा राज्यसभा खासदारकीची निवडणूक लढणाऱ्या जया बच्चन यांनी 10 अब्ज रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. सूत्रांनुसार, जया बच्चन यांच्या विजयाची खात्री आहे. यूपीतून राज्यसभेच्या 10 जागा आहेत. जया यांच्या विजयासाठी फक्त 37 सपा आमदारांची आवश्यकता आहे, हे संख्याबळ सपाकडे आहे. या परिस्थितीत मिसेस बच्चन देशाच्या सर्वात श्रीमंत खासदार बनण्यासाठी तयार आहेत.
6 वर्षांत दुप्पट वाढली संपत्ती
- जया बच्चन यांनी 2012 मध्ये 493 कोटींची संपत्ती घोषित केली होती. या वर्षी त्यांच्या संपत्तीचा एक भागच 462 कोटी रुपयांचा आहे.
- 6 वर्षांनंतर जया यांनी 10 अब्जांपेक्षा जास्त संपत्ती घोषित केली आहे. मागच्या नोंदीपेक्षा जवळजवळ दुप्पट. या घोषणेमुळे त्या देशातील सर्वात श्रीमंत राज्यसभा खासदार बनतील. त्यांचा हा विक्रम मोडला जाणे कठीण आहे.
- 2011-12 च्या आर्थिक वर्षात जया बच्चन यांचे वार्षिक उत्पन्न 14.5 लाख रुपये होते. 2016-17 या आर्थिक वर्षात त्यांनी आपले उत्पन्न 13 लाख रुपयांच्या आसपास दाखवले आहे.
- दुसरीकडे, अमिताभ बच्चन यांनी 2011-12 FY मध्ये 72.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. 2017-18 FY मध्ये बिग बींची इयरली इन्कम 78.6 कोटी रुपये झाली आहे, तब्बल 6 कोटी रुपयांची वाढ.
अमिताभ यांनीही बनवला होता राजकीय विक्रम
- जया बच्चन यांच्या आधी पती अमिताभ यांनीही राजकारणात विक्रम नोंदवलेला आहे. त्यांनी 1984 मध्ये अलाहाबादेतून लोकसभा निवडणूक जिंकली होती. तेव्हा त्यांनी भाजपचे दिग्गज नेते हेमवती नंदन बहुगुणा यांचा विक्रमी मतांनी पराभव केला होता.
- अमिताभ काँग्रेस तिकिटावर विजयी झाले होते. तथापि, त्यांची राजकीय कारकीर्द फक्त 3 वर्षांची राहिली. त्यांनी 1987 मध्ये खासदार पदाचा राजीनामा दिला होता.
- दुसरीकडे, जया 14 वर्षांपासून सातत्याने खासदार पदावर आहेत. पहिल्यांदा त्यांना 2004 मध्ये समाजवादी पार्टीनेच राज्यसभेत पाठवले होते. यानंतर त्या सलग राज्यसभा सदस्य बनलेल्या आहेत.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इतर नेत्यांची संपत्ती...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.