आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • असे सिद्ध करणार बहुमत, पाहा काय असते फ्लोअर टेस्ट? Karnataka Assembly Floor Test Bs Yeddyurappa Bjp Prove Majority Governer

कर्नाटकात असे सिद्ध होणार बहुमत, पाहा काय असते फ्लोअर टेस्ट?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/बंगळुरू - देशभरात सध्या एकच चर्चा आहे, कर्नाटकात कोण सत्ता स्थापन करणार? कर्नाटक विधानसभेमध्ये येदियुरप्पा सरकारच्या बहुमत चाचणी (फ्लोअर टेस्ट) ची चर्चा गल्ली ते दिल्ली सुरू आहे. याच फ्लोअर टेस्टच्या माध्यमातून राज्य सरकारचे भवितव्य ठरणार आहे. 

सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी राज्यपाल वजुभाई वाला यांनी येदियुरप्पा सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेला 15 दिवसांचा अवधी घटवून शनिवारी संध्याकाळी 4 वाजता केला. आणि आदेश दिला की, फ्लोअर टेस्टचे काम संध्याकाळपर्यंत पूर्ण केले जावे.

 

काय असते फ्लोअर टेस्ट?
राज्यात सत्तारुढ भाजप सरकारला आता बहुमत सिद्ध करावे लागेल. सर्वसाधारणपणे राज्यपाल राज्यात सरकार स्थापणाऱ्या पक्षाला बहुमत सिद्ध करण्यासाठी तेव्हाच सांगतात जेव्हा त्यांना माहिती असेल की, सत्ता स्थापणाऱ्या पक्षाकडे पर्याप्त बहुमत नाहीये.

फ्लोअर टेस्टच्या माध्यमातून हा निर्णय घेतला जात आहे की, वर्तमान सरकार वा मुख्यमंत्र्यांकडे पर्याप्त बहुमत आहे अथवा नाही. निवडलेले आमदार आपल्या मताच्या माध्यमातून सरकारच्या भवितव्याचा फैसला करतात.

फ्लोअर टेस्ट विधिमंडळात चालणारी एक पारदर्शी प्रक्रिया आहे आणि यात राज्यपालांचा कोणताही हस्तक्षेप नसतो. सत्तेवर असलेल्या पक्षाने फ्लोअर टेस्टमध्ये बहुमत सिद्ध करणे खूप गरजेचे असते.

 

हंगामी अध्यक्ष घेतात निर्णय
सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ही पूर्ण प्रक्रिया प्रोटेम स्पीकर (हंगामी अध्यक्ष) यांच्या निगराणीमध्ये आयोजित केली जावी. सोबतच ते फ्लोअर टेस्टशी संबंधित सर्व निर्णयही घेतील. तथापि काँग्रेस आणि जेडीएस आमदार के. जी. बोपैया यांना प्रोटेम स्पीकर बनवण्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले होते. तथापि, सुप्रीम कोर्टाने काँग्रेसची मागणी धुडकावून लावली.

नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतल्यानंतर प्रोटेम स्पीकर यांच्या दोन पर्याय असतील. पहिला हा की, फ्लोअर टेस्ट करण्याचा निर्णय घ्यावा आणि बहुमतासाठी मतदान घेण्याचे निर्देश द्यावेत. किंवा मग त्यांनी पहिल्या सदनातील स्पीकरची नियुक्ती करावी.

मतदान होण्याच्या परिस्थितीत आधी आमदारांकडून ध्वनि मत घेतले जाईल. यानंतर कोरम बेल वाजेल. मग सदनात उपस्थित सर्व आमदारांना पक्ष आणि विरोधकामध्ये विभागण्यासाठी सांगितले जाईल.

आमदार सदनात असलेल्या होय अथवा नाहीच्या लॉबीकडे जातील. यानंतर पक्ष-विरोधकांमध्ये विभागलेल्या आमदारांची मोजणी केली जाईल. मग अध्यक्ष परिणामाची घोषणा करतील.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 222 जागांवर आलेल्या निकालामध्ये भाजपला 104 जागा मिळाल्या आहेत आणि ही संख्या बहुमतापेक्षा 8 ने कमी आहे. दुसरीकडे, काँग्रेसला 78 आणि जेडीएसला 37, बसपाला 1 आणि इतरांना 2 जागा मिळाल्या आहेत. कुमारस्वामी यांनी 2 जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे सर्व आमदार उपस्थित राहिल्यास 111 आमदार बहुमतासाठी पाहिजेत.  

 

बातम्या आणखी आहेत...