आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकी तिढा : हे आहेत काँग्रेसचे कथित फुटीर आमदार, दोन रेड्डी बंधुंचे नीकटवर्तीय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरू - कर्नाटक निवडणुकीच्या निकालांमध्ये निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीनंतर बुधवारी कर्नाटकात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अगदी पहाटे पाच वाजेपर्यंत सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी सुरू होती. पण या सर्वामध्ये सध्या सर्वाधिक नजरा आहेत त्या, काँग्रेसच्या तथाकथित फुटीर आमदारांवर. 


काँग्रेस आणि जेडीएस यांच्या आघाडीआधी भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिल्याने मोठा वाद सुरू झाला आहे. त्यात काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत चार आमदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे काँग्रेसच्या चिंता वाढल्या आहेत. कारण या काँग्रेस आमदारांच्या जोरावरच भाजप बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे. हे आमदार भाजपला प्रत्यक्ष पाठिंबा देणार की अनुपस्थित राहून काँग्रेसच्या अडचणी वाढवणार हे नक्की नसले तरी अनुपस्थित आमदारांमुळे काँग्रेस आणि जेडीएसची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे हे नक्की. एकूणच ज्या आमदारांमुळे या संपूर्ण घडामोडी घडत आहेत, ते आमदार नेमके कोण आहेत, याची माहिती आपण आज घेणार आहोत. 


काँग्रेसच्या विधीमंडळपक्षाच्या बैठकीला 4 आमदारांची अनुपस्थिती होती. राजशेखर पाटील, नागेंद्र आणि आनंद सिंह अशी त्यापैकी तिघांची नावे आहेत. एकाचे नाव मात्र अद्याप समोर आलेले नाही. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, कोण आहेत बेपत्ता असलेले काँग्रेसचे हे आमदार...

 

बातम्या आणखी आहेत...