आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • कर्नाटकात पहिल्यांदा: 215 जागा कव्हर करण्याचा प्रयत्न करतील मोदी, लिंगायतांचा कल अजून स्पष्ट नाही Karnataka Election First Time Political Alliance And Others Things

कर्नाटकात पहिल्यांदा: 215 जागा कव्हर करण्याचा प्रयत्न करतील मोदी, लिंगायतांचा कल अजून स्पष्ट नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> जनता दल सेक्युलरला पहिल्यांदा एकत्र 4 पक्षांचे समर्थन
> 2013 च्या जेडीएस आणि बसपाचे व्होट शेअर भाजपच्या मतांपेक्षा जास्त

 

बंगळुरू - या वेळी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत अनेक गोष्टी पहिल्यांदा होत आहेत. जर हे राज्य सत्ताधारी काँग्रेसच्या हातून गेले, तर पक्षाकडे फक्त दोन राज्ये पंजाब आणि पुद्दुचेरी राहतील. भाजपने आपल्या रणनीतीमध्ये बदल करत मोदींच्या रॅलीजची संख्या 15 हून वाढवून 21 केली आहे. कर्नाटक निवडणुकीत एखाद्या पंतप्रधानांच्या आतापर्यंत या सर्वात जास्त प्रचार सभा असतील. दुसरीकडे, सरकार स्थापनेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लिंगायत समुदायाने अजून कल स्पष्ट केलेला नाही. तसेच, भाजपला घेरण्यासाठी जनता दल सेक्युलर आणि बसपाने आघडी केली, हेही तेथे पहिल्यांदाच होत आहे. 

 

या निवडणुकीत पहिल्यांदाच काय होत आहे?

 

1) पहिल्यांदाच कर्नाटकात एखाद्या पंतप्रधानांच्या 21 सभा, 224 पैकी 215 जागा कव्हर करतील
- कर्नाटकातील बदलत्या समीकरणांमुळे भाजपलाही आपल्या रणनीतीत बदल करावा लागला. नरेंद्र मोदींच्या आधी 15 सभा प्रस्तावित होत्या. आता 6 सभा वाढून 21 करण्यात आल्या आहेत. राज्याच्या 62 वर्षांच्या इतिहासात बहुधा असे पहिल्यांदाच होत आहे की, विधानसभा निवडणुकीसाठी एखादे पंतप्रधान एवढ्या सभा घेत असतील. मोदींनी 6 सभा घेतल्या आहेत. मोदी या सर्व सभांच्या माध्यमातून 215 मतदारसंघ कव्हर करतील.

 

2) पहिल्यांदाच जेडीएसला बसपासहित एकत्र 4 पक्षांचे समर्थन
- कर्नाटकात 224 जागांपैकी 36 जागा एससी आणि 15 जागा एसटीसाठी आरक्षित आहेत. तथापि, या 51 एससी-एसटी जागांमध्ये जेडीएसला 2008 मध्ये 2 आणि 2013 मध्ये 13 जागा मिळाल्या होत्या. 2013 मध्ये बसपाला 0.9% आणि जेडीएसला 20.2% मते मिळाली होती. जर ती एकत्र केली तर व्होट शेअर भाजपच्या व्होट शेअर 19.9% पेक्षाही जास्त असेल.
- या 51 जागांसहित राज्यातील तब्बल 60 जागांवर दलित समुदाय आणि 40 जागांवर आदिवासी समुदायाच्या मतदारांचा परिणाम होतो. याच कारणामुळे बसपाने 1996 नंतर पहिल्यांदाच निवडणुकीआधीच एखाद्या पक्षाशी आघाडी केली आहे. ही आघाडी जेडीएसशी झाली आहे. बसपा 22 जागांवर, तर जेडीएस 201 जागांवर निवडणूक लढत आहे.
- जेडीएसला भाजपविरोधी पक्ष एनसीपी, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एआयएमआयएम) आणि तेलुगू देशम पार्टी (टीआरएस) टीआरएसने पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. यामुळे तब्बल 20 जागांवर जेडीएसला फायदा मिळू शकतो.

- एआयएमआयएम आधी राज्यातील 60 जागांवर निवडणूक लढणार होती, परंतु नंतर जेडीएसला समर्थन देण्यामुळे त्यांनी कोणतेही नॉमिनेशन भरले नाही. प्रदेशात 13 टक्के मुस्लिम मतदार आहेत. तटीय कर्नाटकच्या जिल्ह्यांमध्ये याचा फायदा होऊ शकतो. दुसरीकडे, चंद्रशेखर राव यांनी तेलुगू भाषिकांना जेडीएसला मत देण्याचे आवाहन केले आहे.

 

3) लिंगायतांचा कल स्पष्ट नाही
- याच्या पूर्वी राज्यात जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यात लिंगायत मतदारांचा कल स्प्ष्ट होता की, ते कुणाला मते देतील. परंतु या वेळी निवडणुकीआधी काँग्रेसने लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा देण्याची घोषणा केली. यामुळे कल स्पष्ट झाला नाही.
- 1980 च्या दशकात राज्यात तेव्हा जनता दलाचे नेते रामकृष्ण हेगड़े यांच्यावर लिंगायतांनी विश्वास व्यक्त केला होता. नंतर हा समुदाय कांग्रेसच्या वीरेंद्र पाटील यांच्यासोबत गेला. 1989 मध्ये काँग्रेसचे सरकार आले. पाटील मुख्यमंत्री झाले, परंतु राजीव गांधींनी त्यांना या पदावरून हटवले होते.
- यानंतर लिंगायतांनी पुन्हा हेगड़े यांना पाठिंबा दिला. 2004 मध्ये हेगड़े यांच्या निधनानंतर लिंगायतांनी भाजपच्या बीएस येदियुरप्पा यांना आपला नेता निवडले. जेव्हा भाजपने 2011 मध्ये येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले, तेव्हा या समुदायाने भाजपपासून दुरावा वाढवला.

 

2013 विधानसभा निवडणूक : येदियुरप्पा यांनी भाजप सोडताच काँग्रेसची आली सत्ता

पक्ष जागा व्होट शेअर
काँग्रेस 122 36.6%
जेडीएस 40 20.2%
भाजपा 40 19.9%
इतर 22 23.3%
 

 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कर्नाटकची निवडणुकीची इन्फोग्राफिक माहिती...  

 

बातम्या आणखी आहेत...