आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Is The Law Of Dubai Know Why Bollywood Actress Sridevis Dead Body Not Arrive In India After 36 Hours Of Death

दुबईच्या \'या\' नियमांमुळे 36 तासांनंतरही श्रीदेवीचे पार्थिव शरीर नाही आले भारतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - श्रीदेवीच्या मृत्यूनंतर तब्बल 36 तासांनंतरही तिचे पार्थिव शरीर दुबईतून भारतात आणता आले नाही. तथापि, दुबईतील भारतीय दूतावासाचे अधिकारी स्थानिक प्रशासनासह मिळून पूर्ण प्रक्रियेसाठी प्रयत्न करत आहेत.

कौन्सिल जनरल ऑफ इंडिया विपुल म्हणाले, आम्ही श्रीदेवीयांच्या पार्थिवाला भारतात आणण्यासाठी दुबई पोलिसांसह मिळून लगातार काम करत आहोत. श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर लगेचच विपुल आणि भारतीय दूतावासाचे अधिकारी कपूर परिवारासह उपस्थित आहेत. वास्तवात, दुबईतील कायदे खूप कडक आहेत. ही सर्व नियमांची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही विदेशी नागरिकाचा मृतदेह नेता येऊ शकत नाही. आज आम्ही दुबईच्या अशाच कायद्यांची माहिती देत आहोत, जे तुम्हाला माहिती असले पाहिजेत.

 

आता काय सुरू आहे...
दुबईचे फॉरेंसिक डिपार्टमेंट तपास करत आहे. फॉरेंसिक डिपार्टमेंट ब्लड टेस्ट रिपोर्ट पोलिसांना सोपवेल. पोलिस क्लिअरन्स आणि फॉरेंसिक रिपोर्ट मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रियेला सुरुवात होईल. पुढच्या 2 ते 3 तासांत इमिग्रेशन आणि एम्बॉलमिंगची प्रॉसेस पूर्ण होऊ शकते. सोमवारी सकाळपासूनच श्रीदेवीचा मृतदेह दुबई पोलिसांच्या फॉरेंसिक डिपार्टमेंटजवळ आहे.

 

सामान्य मृत्यू झाल्यावरही होते पोस्टमार्टम....
> दुबईच्या कायद्यानुसार, तेथे एखाद्या परदेशी नागरिकाचा अचानक मृत्यू झाला, तर पोस्टमॉर्टम अनिवार्यपणे केले जाते. याचा उद्देश मृत्यूच्या खऱ्या कारणांचा शोध घेणे असा आहे.
> पोलिसांची कागदोपत्री कारवाई प्रदीर्घ असते. पोस्टमार्टम रिपोर्टवर पोलिसांचा मोहोर असते. पूर्ण पडताळणी केल्यानंतर संबंधित देशाच्या दूतावासाला माहिती दिली जाते. मग दूतावासाद्वारे मृताचे पासपोर्ट कॅन्सल केले जाते.
> यासोबतच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) जारी केले जाते. एवढी सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच एखाद्याचे पार्थिव दुबईबाहेर न्यायला परवानगी आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, दुबईच्या अशाच कायद्यांबाबत, ज्यांची तुम्हाला माहिती असावी...

बातम्या आणखी आहेत...