आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह-सेक्स अन् धोका: आईवडिलांनी विकले, प्रियकरासह पळून गेली; तरीही भोग संपलेच नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - जेव्हा ती फक्त 14 वर्षांची होती तेव्हा मुंबईत तिच्या आईवडिलांनीच तिच्या शरीराचा सौदा केला. मग अनेक जणांसोबत अनेक शहरांत फिरून ती अहमदाबादेत पोहोचली. दरम्यान, एका कस्टमरशी तिचे प्रेमसंबंध जुळले, मग ते दोघेही तिथून पळून गेले.  यानंतर काही दिवसांनीच तिच्या प्रियकराने तिला दगा दिला, तिला पुन्हा वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकवले. थकून-भागून तिने पोलिसांना मदत मागितली. सध्या ती नारी संरक्षणगृहात आहे.

 

मायबापानेच बनवले वेश्या...
लहान वयातच मायबापाने तिच्याकडून देहव्यापार करून घेतला. तिला 2 वर्षे ते वेगवेगळ्या कस्टमरकडे पाठवत राहिले. यातून होणाऱ्या कमाईने तिच्या मायबापाची गरिबी दूर झाली. ते तिला म्हणायचे- "पोरी, आपली गरिबी आहे, तू अजून दोन वर्षे धंदा कर, मग तुझे लग्न लावून देऊ." पण तिला कुठे माहिती होते, हा धंदा आता तिच्या आयुष्याला जळूसारखा चिकटला आहे.

 

2 लाखांत झाला होता लेकीचा सौदा
दोन वर्षांनी आईवडिलांनी अहमदाबादच्या एका महिलेला आपल्या मुलीची दोन लाखांत विक्री केली. त्या महिलेने तिचे प्रचंड शोषण केले. तीही तिला विकण्याच्या विचारात होती. तेवढ्यात नेहमी ग्राहक बनून येणाऱ्या एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध जुळले. तो तिला घेऊन नवे आयुष्य जगण्याची स्वप्ने पाहू लागला. तरुणाने तिला अनेक स्वप्ने दाखवली. मग एका दिवशी ती त्याच्यासोबत पळून गेली. 

 

खरे रूप आले समोर
ग्राहक बनून येणाऱ्या तरुणासोबत ती पळून तर गेली, पण तिला थोड्याच दिवसात तिला कळले की, आपल्या जीवनातला अंधार कधीच दूर होणार नाही. प्रियकराने काही दिवसांतच तिला खरे रूप दाखवले. तो तिला देहव्यापार करण्यासाठी मजबूर करू लागला. आता तो किरायाच्या खोलीतच ग्राहकांना घेऊन येऊ लागला. यामुळे ती पुन्हा संकटात सापडली. शेवटी तिचा संयम संपला आणि एका दिवशी तिने 181 ला कॉल करून आपली आपबीती ऐकवली. तिने स्वत:ची या दलदलीतून सुटका करण्याची विनंती केली.

 

समुपदेशन झाले
तिचा प्रियकर राहुलची वर्तणूक पाहून तिने हेल्पलाइनला फोन करून मदत मागितली. महिला समुपदेशक शीतल तिच्या निवासस्थानी पोहोचल्या. त्यांनी तेथे जाऊन तिची परिस्थिती पाहिली. तिने सांगितले की, तिच्या आईवडिलांनीच तिला या धंद्यात ढकलले आहे, मी त्यांच्याकडे कधीच जाणार नाही. प्रियकराने धोका दिला, तोही आता फरार आहे. यामुळे मग तिला नारी संरक्षण गृहात पाठवण्यात आले. आता महिला पोलिस तिचे आईवडील, अहमदाबादची आँटी आणि कथित प्रियकर राहुलचा शोध घेत आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर इन्फोग्राफिकमधून जाणून घ्या घटना... 

बातम्या आणखी आहेत...