आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अहमदाबाद - कृष्णनगरमधील रहिवासी 32 वर्षीय महिलेच्या भाच्याने 6 महिन्यांपूर्वी आपल्या आत्यावर अनेकवेळा बळजबरी केली. तसेच याचा व्हिडिओही शूट केला. यानंतर तो सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करू लागला. विवाहितेने त्रस्त होऊन ही बाब आपल्या पतीला सांगितली. यानंतर दोघांनी मिळून कृष्णनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
नोकरीसाठी आला होता भाचा, राहायचा आत्याकडे...
पोलिसांत लिहिलेल्या तक्रारीनुसार, कृष्णनगरमधील रहिवासी 32 वर्षीय महिलेचा भाचा राहुलने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केले. तिचा पती 6 महिन्यांपूर्वी नोकरीनिमित्त बाहेरगावी गेला होता. तेव्हा राहुलने आपल्या आत्यावर बलात्कार केला. यादरम्यान त्याने तिचा व्हिडिओही शूट केला. तसेच तो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेक वेळा तिचे शारीरिक शोषण केले.
जिवे मारण्याची दिली धमकी
महिलेने सांगितले की, 1 जानेवारी 2018 रोजी तिने आपल्या भाच्याला समज देऊन घरी परत पाठवले होते. यानंतर 1 एप्रिल रोजी तो पुन्हा परत आला. दुपारी घरात एकटी पाहून त्याने आत्याला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू असल्याचे म्हटले आहे.
पुढील स्लाइड्सवर, इन्फोग्राफिकमधून जाणून घ्या प्रकरण...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.