आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढा पाशवी बलात्कार की गळा दाबल्यावरही नराधमांनी तोडले लचके, श्वान पथकामुळे कळले रहस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मतलौदा/पानिपत - पोलिसांनी उरलाना कलां गावातील 6वीच्या (वय 12) विद्यार्थिनीवर पाशवी बलात्कारानंतर हत्येच्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. श्वान पथक रविवारी घटनास्थळी पोहोचले. टीम नाल्याच्या जवळून हस्तगत केलेल्या मृतदेहाजवळ श्वानपथकाला घेऊन पोहोचली. श्वानांनी मृतदेह हुंगल्यानंतर आरोपी प्रदीपच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. घराला टाळे लागलेले होते. पोलिसांनी कुलूप तोडून तपास केला तेव्हा पाशवी अत्याचाराचे पुरावे मिळाले.  

 

घटनास्थळी पोलिसांना जळालेले कपडे मिळाले...
- घटनास्थळी चिमुकल्या विद्यार्थिनीचे जळालेले कपडे, रक्ताचे डाग मिळाले. ज्या कचरापेटीत मुलगी कचरा फेकायला जात होती, तेही हस्तगत करण्यात आले आहे. प्रदीपवर पोलिसांना संशय आला तेव्हा गर्दीतून त्याला पकडून पोलिसांत नेण्यात आले. 
- पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गावातीलच सागरसोबत मिळून पाशवी बलात्कार केल्याचे कबूल केले. यानंतर पोलिसही सागरला घटनास्थळावरून पकडून घेऊन गेले. 
- चौकशीत दोघांनी कबूल केले की, बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या करून पुरावा नष्ट करून काडीकचऱ्याला आग लावून मुलीचे कपडे जाळले होते. 
- कचरापेटीतून दोघांनी शेजाऱ्याच्या रिकाम्या घरातील कपड्यांखाली लपवले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून दारूच्या बॉटलचे झाकण, अंमली पदार्थ असलेल्या विड्या जप्त केल्या आहेत.

 

आरोपींनी केले कबूल- रेप केल्यावर हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी जाळले होते चिमुकलीचे कपडे 
चौकशीत आधी आरोपी म्हणत होता की, तुम्ही हे काय बोलत आहात? ती माझी नात लागते, पण प्रत्येक वेळी विसंगत जबाब देऊन तो स्वत:च फसला.

 

रात्री पोलिसांनी तक्रारही घेतली नाही...
- चिमुकलीच्या आजीचे म्हणणे आहे की, कचरा फेकण्यासाठी गेलेली त्यांची नात घरी परतली नाही. यानंतर त्यांनी तिचा शोध घेतला, आढळली नाही म्हणून घरच्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत पोलिस चौकीत गेले होते. तेथे त्यांचे कुणीही ऐकून घेतले नाही.
- आजी म्हणाल्या की,  पोलिस कर्मचारी म्हणत होते की मुलगी एखाद्या शेजाऱ्याच्या घरात झोपलेली असेल. सकाळपर्यंत परत येईल. तुम्ही वाट पाहा.
- पोलिसांनी रात्री मुलीचा शोध घेण्याची तसदी घेतली नाही. एवढेच काय, ते घटनास्थळीही तेव्हा फिरकले नाहीत.
- जर पोलिसांनी रात्रीच शोध घेतला असता, तर चिमुकली आढळली असती. चौकी इंचार्ज एसआय रामेश्वर दत्त यांनी पीडितेच्या कुटुंबीयांनाच खोटे ठरवले. म्हणाले की, कुटुंबीय आमच्याकडे तक्रार घेऊन आलेच नव्हते.
- त्यांनी मृतदेह आढळल्यानंतर कुटुंबीयांना माहिती दिली. यानंतर ते पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- डीएसपी संदीप म्हणाले की, गावातील 24 वर्षीय सागर आणि 25 वर्षीय प्रदीपला अटक करण्यात आली आहे. नात्याने आरोपी प्रदीप पीडितेचा आजोबा आणि सागर मामा लागतो. प्रदीपचे एका तरुणीशी अवैध संबंध आहेत, ज्याची चिमुकलीला माहिती होती.
- तिने काही दिवसांपूर्वी प्रदीपला प्रेयसीला पत्र देताना पाहिले होते. प्रदीपला भीती होती की मुलगी गावात सगळ्यांना सांगून देईन. चिमुकलीने एकदा त्याला 20 रुपये मागितले होते, न दिल्यास सगळ्यांना सांगण्याची धमकी दिली होती. यानंतर त्याने खुनाचा कट रचला.
- 7 दिवसांपूर्वी प्रदीपची पत्नी आपल्या एका मुलासह माहेरी गेली होती. शुक्रवारी तो सागरसोबत आपल्या घरात दारू पित होता.
- संध्याकाळी 5 वाजता चिमुकली घरासमोरून जाताना त्याला दिसली. तेव्हा त्याने टॉफी देण्याचे आमिष दाखवून तिला घरात ओढले. दोघेही तिच्या देहाचे लचक तोडत राहिले. तिच्याच ओढणीने तिचा आवळला. यानंतरही नराधम तिच्यावर रेप करत राहिले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या संतापजनक घटनेचे इन्फो... आणि आक्रोशित गावकऱ्यांचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...