आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • N Chandrababu Naidu Turns TDP Electoral Agenda In Mahanadu Conference In Vijaywada

2019 च्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही ‘किंगमेकर’च राहणार- चंद्राबाबू नायडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजयवाडा- 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही आपण ‘किंगमेकर’च राहू, ‘किंग’ होणार नाही, असे प्रतिपादन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी केले.

 

पक्षाच्या तीन दिवसांच्या ‘महानाडू’ या वार्षिक अधिवेशनानंतर दिल्लीतील पत्रकारांशी चर्चा करताना नायडू म्हणाले की, माझी कुठलीही वैयक्तिक इच्छा नाही. आमचा पक्ष एक जबाबदार पक्ष आहे. मी याआधीही आघाडीची दोन सरकारे स्थापन करण्यास मदत केली होती, पण त्या बदल्यात कधीही काहीही मागितले नाही. या वेळीही आम्ही ‘किंगमेकर’च बनू, ‘किंग’ नाही. मोदी सरकारच्या उक्ती आणि कृतीत खूप फरक आहे, त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याच्या अपेक्षांवर पाणी फेरण्यात प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या राज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करून दक्षिण भारतीय राज्यांत भाजपच्या प्रवेशाची उत्तम संधी मोदींनी गमावली आहे, अशी टिप्पणीही नायडू यांनी केली.

 

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात मोदींची मोहीम खोटी असल्याची टीका करून नायडू म्हणाले की, पंतप्रधानांची प्रामाणिक नेता ही प्रतिमा कर्नाटकच्या निवडणुकीत पूर्णपणे धुळीस मिळाली आहे. भाजपने कर्नाटक निवडणुकीत भ्रष्ट उमेदवारांनाच संधी दिली. दक्षिण भारतीय राज्ये मोदी सरकारबद्दल खूपच नाराज आहेत. त्यामुळे केंद्रात पुढील सरकार प्रादेशिक पक्षांच्या आघाडीचेच असेल.
 
काँग्रेस, भाजप दोघांच्याही विरोधात लढणार
प्रादेशिक पक्ष काँग्रेस आणि भाजप या दोघांच्याही विरोधात लढण्यासाठी एकत्र येतील. इतिहास पाहिल्यास दोन्ही राष्ट्रीय पक्ष बेजबाबदार आहेत, असे लक्षात येईल. आम्हाला दोघांच्याही विरोधात लढायचे आहे.

 

बातम्या आणखी आहेत...