आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराललितपूर(यूपी) - येथे 18 वर्षीय एका नवविवाहितेचा अचानक खाटेवरून पडून मृत्यू झाला. मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप करून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे, सासरचे म्हणाले की, ''अनेक महिन्यांपासून सुनेची तब्येत ठीक नव्हती. 9 फेब्रुवारी रोजी ती अचानक खाटेवरून पडली. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो परंतु तिचा मृत्यू झालेला होता.
म्हणाले- सुनेला भूताने पछाडले होते...
- ही घटना पठापुरा गावातील आहे. येथील रहिवासी मृत अनामिका (18 वर्षे) हिचे लग्न 22 जून 2017 रोजी अमरसोबत झाले होते.
- सासरे राजाराम म्हणाले, ''सुनेला भुताने पछाडलेले होते. तिला ठीक करण्यासाठी अनेक मांत्रिकांकडे आम्ही घेऊन गेलो होतो. अनेक मंदिरांत जाऊन तंत्रमंत्रही केले, पण काहीच फायदा झाला नाही.''
- ''9 फेब्रुवारी रोजी खाटेवर सून झोपलेली होती, तेवढ्यात अचानक ती खाली पडली. बेशुद्धावस्थेत तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.''
वडिलांनी केला हत्येचा आरोप...
- दुसरीकडे, मृत विवाहितेचे वडील स्वरूपा म्हणाले, ''7 लाख रुपये देऊन मुलीचे लग्न लावले होते. हुंड्यात 5 लाख कॅश आणि एक बाइकही दिली होती. तरीही तिच्या सासरचे आणखी एका लाखासाठी तिला मारहाण करत होते. त्या दिवशी (9 फेब्रुवारी) माझ्या मुलीला बेदम मारहाण झाली आणि मग गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. माझ्या मुलीला भूत-बित काही लागले नव्हते.''
काय म्हणतात पोलिस?
- पोलिस अधिकारी जयप्रकाश राम म्हणाले की, ''मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. तथ्य आढळल्यास निश्चितच कडक कारवाई केली जाईल.''
पुढील स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे इन्फोग्राफिक्स व फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.