आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या 'या' राज्यात फक्त 2 भिकारी, वाचा- कुठे आहेत सर्वात जास्त?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - बाजारपेठेपासून ते शहरात बनलेल्या मोठमोठ्या मॉल्ससमोर तुम्हाला येता-जाता भिकारी आढळतील. त्यांना काही पैसे देऊन तुम्ही पुन्हा पुढे जाता, पण कधी विचार केला की, भारतात या भिकाऱ्यांची संख्या तरी किती आहे? आणि कोणत्या प्रदेशात यांची संख्या सर्वात जास्त आहे? सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी याचे उत्तर लोकसभेत दिले आहे. त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, देशात 4 लाखांहून जास्त भिकारी आहेत. 

 

कुठे आहेत सर्वात जास्त भिकारी... 

 

सर्वात जास्त भिकारी?
सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी लेखी उत्तरात सांगितले की, देशाच्या 2011च्या जनगणनेनुसार संपूर्ण भारतात 4,13,670 भिकारी आहेत. यात 2,21673 पुरुष आणि 1,91997 स्त्रिया आहेत. सर्वात जास्त भिकारी पश्चिम बंगालमध्ये आहेत. येथे भिकाऱ्यांची संख्या 81,000 आहे.

 

सर्वात कमी भिकारी?
केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत म्हणाले की, केंद्रशासित प्रदेशांत भिकाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे. लक्ष्यद्वीपमध्ये 2, दादरा आणि नगर हवेलीमध्ये 19, दीव आणि दमनमध्ये 22, तर अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात फक्त 56 भिकारी आहेत.

 

दिल्लीत किती भिकारी? 
देशाच्या राजधानीत 2,187 आणि चंदिगडमध्ये 121 भिकारी आहेत.

 

दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर कोणती राज्ये?
या यादीत दुसऱ्या नंबरवर आहे यूपी. येथे भिकाऱ्यांची संख्या 65,835 आहे, तर तिसऱ्या नंबरवर आंध्र प्रदेश आहे. येथे 30,218 भिकारी आहेत. बिहारमध्ये 29,723 भिकारी आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित इन्फोग्राफिक्स... 

बातम्या आणखी आहेत...