आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या नशेत सख्ख्या बापानेच केले हे कृत्य; आई-मुलीने घेतली पोलिसांत धाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारां​ - येथे माणुसकीला काळिमा फासणारी खळबळजनक घटना समोर आली. एका नराधमाने आपल्याच पोटच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. नशेत तर्रर झालेल्या या नराधमाच्या मुलीच्या किंकाळ्या ऐकून तिच्या मोठ्या बहिणीने तिला वाचवले. यानंतर दोन्ही बहिणी आपल्या आईसह थेट पोलिस स्टेशनमध्ये गेल्या. येथे पोलिसांनी पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी बापाला अटक केली आहे.

 

असे आहे प्रकरण...
- पोलिस स्टेशन इंचार्ज दलबीर सिंह फौजदार म्हणाले की, अटकेतील आरोपी बाप कवाईं जिल्ह्यातील भोंरा गावचा रहिवासी आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. यामुळे 8 मार्च रोजी आरोपी बापाने आपल्या सख्ख्या 14 वर्षीय बलात्काराचा प्रयत्न केला. यामुळे घाबरून जाऊन मुलीने ओरडाओरड सुरू केली. तिचा आवाज ऐकून मोठी बहीण धावत तेथे आली आणि तिने दारुड्या बापाच्या तावडीतून आपल्या लहान बहिणीची सुटका केली.
- यानंतर आईने आपल्या पीडित मुलीसह पोलिस स्टेशनमध्ये आली आणि पोलिसांना भेटून आपबीती ऐकवली. यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि फरार झालेल्या आरोपी बापाचा शोध घेऊन त्याला अटक केली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिक्समधून घटनाक्रम...

बातम्या आणखी आहेत...