आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रलयकारी पूरात अडकली होती गरोदर महिला..हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करून हॉस्पिटलमध्ये पोहोचवले, Video व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची- केरळमध्ये शतकातील सर्वात प्रलयकारी महापूर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील पूर प्रभावित भागात हवाई दौरा केला. गुरुवार आणि शुक्रवारी झालेले भूस्खलन आणि आलेल्या पुरात 180 जणांचा बळी गेला आहे.

 

केरळमध्ये  8 ऑगस्टपासून 178 तर पावसाळ्यातील एकूण बळींचा अकडा 385 वर गेला आहे. राज्यातील 12 जिल्ह्यात 3.14 लाख लोक बेघर झाले आहेत. त्यांना 1568 मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. 8 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. दुसरीकडे, एनडीआरएफचे मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. सोशल मीडियावर नौदलाद्वारा एका गरोदर महिलेला एअरलिफ्ट करून हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

एअरलिफ्ट करून गरोदर महिलेला पोहोचवले हॉस्पिटलमध्ये
भारतीय नौदलाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर गरोदर महिलेला हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करून हॉस्पिटलमध्ये सुरक्षित पोहोचवल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ही महिला पूरात अडकली होती. तिला बाहेर करण्‍यासाठी वॉटर बॅगची मदत घेण्यात आली. मात्र, वॉटर बॅग लीक झाल्याने महिलेला वाचवण्यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करून सुरक्षित हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले. नौदलाच्या जवानांची जिद्द पाहून प्रत्येक युजर त्यांना सलाम करत आहे.

 

महिलेला सुरक्षित हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्यानंतर नौदलाकडून आणखी एक ट्वीट करण्यात आले आहे. त्यात 'ऑपरेशन सक्सेसफुल' असे म्हटले आहे. महिलेची काही फोटो शेअर करण्‍यात आली असून तिने एका गोंडस मुलाला जन्म दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...