आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वेळा प्रेम, तरीही लग्न नाही; त्यांनी कामालाच बनवले आपला व्हॅलेंटाईन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात झालेली आहे. प्रेम अशी भावना आहे ज्यामुळेच आयुष्याला अर्थ प्राप्त होतो. प्रेम मग ते एखाद्या व्यक्तीशी असो, एखाद्या वस्तूशी असो वा आपल्या कामाशी असो ते नि:स्वार्थ आणि अमूल्य असते. आपल्या कामावरच ज्यांनी प्रेम केले, आपले सर्वस्वी अर्पण केले आणि जगासमोर आदर्श उभा केला अशा जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांची ही माहिती यानिमित्ताने DivyMarathi.Com देत आहे.

> बिझनेस जगात सेलिब्रिटी असणारे रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला. 1961 मध्ये टाटा ग्रुपमध्ये आपली कारकिर्दी सुरू केल्यानंतर 1991 मध्ये कंपनीचे अध्यक्ष बनले. वाढदिवसाच्या दिवशीच ते 2012 साली रिटायर झाले. रतन टाटा 2012 मध्ये निवृत्त झाल्यानंतर कंपनीला मोठे करण्यामध्ये खुप मेहनत घेतली आहे. रतन टाटाने गेल्या 21 वर्षांमध्ये अध्यक्ष राहून कंपनीला एक वेगळी ओळख करून दिली आहे. भारतामध्ये सर्वात प्रतिष्ठित आणि यशस्वी उद्योगपती रतन टाटा यांची ओळख आहे. 

 

4 वेळा झाले प्रेम, तरीही राहिले अविवाहित

> टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा यांना आयुष्यात एकदा नव्हे तर चार वेळा प्रेम झाले. मात्र, त्यांना एकीशीही लग्न करता आले नाही. आपल्या लग्नाबाबत आणि प्रेमाबाबत एकदा त्यांनी जाहीर खुलासा केला होता. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, माझ्या आयुष्यात मी चारदा प्रेमात पडलो. मात्र, प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने लग्न होऊ शकले नाही. ते म्हणतात की, बरं झालं माझे लग्न झाले नाही नाहीतर माझे आयुष्य अधिक खडतर असते.

रतन टाटा यांनी आपल्या एका प्रेमाविषयी ज्यात ते खूपच सिरियस होते त्याबाबत सांगताना म्हटले होते की, जेव्हा मी अमेरिकेत काम करत होतो तेव्हा तेथील एका मुलीवर माझा जीव जडला होता. त्या वेळी तिने आणि मी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो काळ होता 1962 चा. नेमक्या त्याच वेळी भारत-चीन युद्ध सुरू झाले होते. त्या परिस्थितीत रतन टाटा भारतात परतले. मात्र, त्यांची मैत्रीण भारतात परतण्यास राजी नव्हती. भारत आपल्यासाठी सुरक्षित नसेल असे तिचे म्हणणे होते. मात्र, टाटांनी तेथे थांबून तिच्याशी लग्न न करता भारतात परतण्याचा निर्णय घेतला. हे लग्नही होता-होता राहिले. त्या मुलीने वर्षभरानंतर दुस-या मुलाशी लग्न केले.

 

कामावर आणि पुस्तकांवर केले प्रेम...
रतन टाटा पुस्तकप्रेमी आहेत. त्यांना यशस्वी लोकांच्या स्टोरीज वाचायला आवडतात. ते म्हणतात, रिटायरमेंटनंतर आपल्या आवडी-निवडी व छंदांना वेळ देऊ शकत आहेत. टाटांच्या घरात पुस्तकांसाठी भलीमोठी जागा आहे.
> रतन टाटा स्वभावाने लाजाळू आहेत. त्यांना पुढे-पुढे करायला अजिबात आवडत नाही. शांत, संयमी, मनाने स्वच्छ व प्रामाणिक असलेले टाटा लहानपणापासून मोजके व आटोपशीर बोलतात. ते आपल्या जवळच्या मित्रांशी व सहका-यांशी मोजकेच बोलतात व संवाद साधतात. त्यांच्या आवडीनिवडी पाहिल्या तर वाटते की त्यांच्या मनात खूप काही आहे व ते त्यांनी लपविले आहे.
> भारतासह जगभरात औद्योगिक विकासात टाटांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी स्वत:च्या विश्वासाचा आणि मूल्यांचा अत्यंत प्रभावी ठसा उमटवला. म्हणूनच उद्योग जगतात ते आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकले. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, उद्योगपती रतन टाटा यांच्या इन्स्पायरिंग लाइफमधील फॅक्ट्स

बातम्या आणखी आहेत...