आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदाराची अशी दहशत: एके 47 मधून 400 राउंड फायर, 7 जणांच्या बॉडीमधून निघाल्या 67 गोळ्या..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - ज्यांचे नाव बाहुबली, दबंग नेता म्हणून घेतले जाते अशा मुख्तार अन्सारींना हृदयविकाराचा झटका आल्याने प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यांना उपचारांसाठी त्वरित रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे. यानिमित्त DivyaMarathi.Com तुम्हाला सांगत आहे की, कसा एक गुन्हेगारी जगतातील कुख्यात गँगस्टर राजकारणात आला.  

 

फिल्मी नाही, रिअल अन् रक्तरंजित आहे यांची स्टोरी....
आतापर्यंत तुम्ही नेहमी चित्रपटांतून पाहिले असेल, कुख्यात गुन्हेगार आपल्या गुंडगिरीच्या- दहशतीच्या जोरावर बंदुकीच्या धाकाने आपल्या परिसरातील लोकांमध्ये जरब बसवतो आणि विरोध करणाऱ्यांना ठार करत सुटतो. एवढेच नाही, हे सर्व प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणारे त्याच्याविरुद्ध साक्ष देण्याची हिंमतही करत नाहीत, जे हिंमत करतात, त्यांनाही तो यमसदनी पाठवतो. काहीशी अशीच फिल्मी पण रिअल स्टोरी आहे आमदार मुख्तार अन्सारींची.

उत्तर प्रदेशच्या पूर्वोत्तर भागात आपल्या दहशतीच्या जोरारवर हत्या, खंडणी, गुंडा टॅक्स, अपहरणसहित असे अनेक काळे धंदे मुख्तार अन्सारींनी केले ज्यांची कायद्याने गुन्ह्यांमध्ये नोंद होईल.

 

हिस्ट्री ऐकून अवाक होतात सर्व...  
- मुख्तार अन्सारी यांची फॅमिली हिस्ट्री ऐकली तर दोन मिनिटांनी कळते की, आपलाही आश्चर्याने आ वासला आहे. यांचे आजोबा काँग्रेसचे एकेकाळी प्रेसिडेंटही राहिले आहेत- मुख्तार अहमद अन्सारी. यांचे भाऊ अफझल 4 वेळा कम्युनिस्ट पार्टीतून आमदार राहिलेले आहेत आणि एक वेळा समाजवादी पक्षाकडून. अन्सारीचे म्हणणे आहे की, त्यांचे वडील आणि आजोबा फ्रीडम फायटर होते. सोबतच काका आणि आजोबा नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि गांधीजींच्या खूप जवळचे होते. काका हामिद अन्सारी अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरूही राहिलेले होते.


मखनू गँगचा सदस्य ते गुंडा टॅक्स वसुली 
मुख्तार अन्सारी मुख्य रूपाने मखनूसिंह गँगचे सदस्य होते, ज्यांचा 1980 पासून साहिब सिंह गँगशी जमिनीवरून अनेक वेळा रक्तरंजित संघर्ष उडालेला आहे.
- साहिब सिंह गँगचा प्रमुख बृजेश सिंह होता, ज्याने नंतर स्वत: आपली गँग बनवली आणि गाझीपूरमध्ये 1990 मध्ये काँट्रॅक्ट माफिया बनला. अन्सारीचा थेट संघर्ष बृजेश सिंहशी होता. दोन्ही गँग कोळसा, खाण, रेल्वे काँट्रॅक्ट, दारूसहित अनेक धंदे करायच्या. या दोन्ही गँग गुंडा टॅक्स आणि खंडणी वसुलीचे रॅकेटही चालवायच्या.

 

गुन्हेगारी जगताचा बादशहा...
गुन्हेगारी जगताचा बेताज बादशहा मुख्तार अन्सारी मऊ, गाझीपूर, वाराणसी, जौनपूरमध्ये कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळखले जायचे. परंतु गुन्हेगारी जगतातून त्यांनी 1995 मध्ये राजकारणात प्रवेश केला. आणि 1996 मध्ये आमदारही बनले.

 

रक्तरंजित संघर्ष
यादरम्यान, अन्सारी आणि बृजेश सिंह यांच्या चकमक उडत होती. अन्सारीच्या एका रॅलीवर बृजेश सिंहने हल्लाबोल केला होता. तेव्हा प्रचंड गोळीबारीत अन्सारीच्या 3 माणसांचा मृत्यू झाला होता. बृजेश सिंहही गंभीर जखमी झाला होता आणि तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचीही अफवा पसरली होती. 
अन्सारीचा राजकीय प्रभाव कमजोर करण्यासाठी बृजेश सिंहने भाजपच्या कृष्णानंद राय यांचा प्रचार करणे सुरू केले. रायने अन्सारींचा भाऊ अफझल जे 5 वेळा आमदार राहिलेले होते, त्यांचा पराभव केला.

मुख्तार अन्सारींनी आरोप केला की, आमदार म्हणून राय यांनी बृजेश सिंहला अनेक काँट्रॅक्ट दिले आणि दोघांनी मिळून त्यांचा सफाया करण्याचे षडयंत्रही रचले होते.

 

मुस्लिम व्होट बँकेचे राजकारण
राजकारणात आपली बाजू मजबूत करण्यासाठी अन्सारीनी पुन्हा एकदा चाल खेळली आणि मुस्लिम व्होट बँकेवर आपली दावेदारी सुरू केली. गाझीपूर-मऊ येथे अन्सारींचे विरोधक हिंदूंशी संपर्क साधत होते, तेव्हा अन्सारींनी मुस्लिम व्होट बँकेशी संपर्क साधला. यामुळे परिसरात अनेक वेळा दंगली आणि हिंसात्मक घटना घडल्या. यामुळे अन्सारीला दंगली घडवण्याच्या आरोपाखाली अटकही झाली.


अनेक हत्यांचा मास्टरमाइंड अन्सारी
अन्सारी जेव्हा तुरुंगात होता, तेव्हा कृष्णानंद राय आणि त्याच्या 6 सहकाऱ्यांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी एके 47 मधून तब्बल 400 राउंड फायर केल्या. 7 मृतदेहांमधून 67 गोळ्या आढळल्या होत्या. मृतांच्या देहाची अक्षरश: चाळणी झाली होती. याप्रकरणी मुख्य साक्षीदार शशिकांत राय यांचा संशयास्पदरीत्या गूढ मृत्यू झाला. तथापि, पोलिसांनी याला आत्महत्या मानायला नकार दिला. या हत्याकांडानंतर बृजेश सिंह फरार झाला.

 

साक्षीदारांना जिवे मारायचा अन्सारी
- बृजेश सिंहला 2008 मध्ये ओडिशातून अटक करण्यात आली होती, नंतर त्याने प्रगतिशील मानव समाज पार्टीकडून राजकारणात पाऊल ठेवले. 2008 मध्ये मुख्तार अन्सारीविरुद्ध धर्मेंद सिंहवर हल्ला केल्याचे प्रकरण दाखल झाले. धर्मेंद सिंह हत्येचा साक्षीदार होता. तथापि, नंतर धर्मेंद सिंहच्या कुटुंबीयांनी अन्सारीविरुद्धचे प्रकरण परत घेण्यासाठी अर्ज केला.

2009 मध्ये पोलिसांनी अन्सारीचे नाव चार्जशीटमध्ये कपिलदेव सिंह हत्येप्रकरणी दाखल केले. पोलिसांनी आपल्या चार्जशीटमध्ये अन्सारीला अजय प्रकाश सिंह हत्येचा आरोपीही मानले. 2010 मध्ये अन्सारीवर राम सिंह मौर्याच्या हत्येप्रकरणी गुन्हा नोंद झाला. येथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे मौर्या हे मन्नत सिंह हत्येतील साक्षीदार होते. मन्नत सिंह स्थानिक ठेकेदार होता, ज्याची अन्सारी गँगच्या गुंडांनी हत्या केली होती.


मायावती म्हणाल्या, गरिबांचा मसिहा...
मुख्तार अन्सारी 2007 मध्ये पहिल्यांदा बसप आमदार बनले, अन्सारींनी स्वत:ला सर्व प्रकरणांत निर्दोष सांगितले. यानंतर मायावतींनी त्यांना गरिबांचा मसिहा, रॉबिनहूड असल्याचे सांगितले. तेव्हाच अन्सारीची प्रतिमा रॉबिनहूडप्रमाणे स्थापित झाली.
अन्सारीने 2009 मध्ये लोकसभा लढवली. त्या वेळीही तो तुरुंगातच होता, परंतु भाजपच्या मुरली मनोहर जोशींकडून त्याचा पराभव झाला.

 

अन्सारीची मुले आहेत करोडपती...
मुख्तार अन्सारीला दोन मुले आहेत आणि दोन्हीही करोडपती आहेत. दोन्ही मुलांच्या नावे 3 कोटी 69 लाख रुपयांची संपत्ती आहे. मुलगा अब्बासकडे 2 कोटी 20 लाख आणि दुसरा मुलगा उमरकडे 1 कोटी 45 लाखांची जमीन आहे. अब्बास एक आंतरराष्ट्रीय शूटर आहे आणि अनेक आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या शूटिंग स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. त्याने अनेक किताबही आपल्या नावे केले आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, मुख्तार अन्सारींशी संबंधित इन्फोग्राफिक फॅक्ट्स...

बातम्या आणखी आहेत...