आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरातून परत येत होती विद्यार्थिनी, शिक्षकाने घरी सोडण्याच्या बहाण्याने केला बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित विद्यार्थिनी म्हणाली, शिक्षकाने कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. - Divya Marathi
पीडित विद्यार्थिनी म्हणाली, शिक्षकाने कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

बुंदेलखंड - बांदामध्ये टीचरकडून विद्यार्थिनीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. सूत्रांनुसार, विद्यार्थिनी मंदिरातून घरी परतत होती. दरम्यान, तिला शिक्षक भेटला आणि म्हणाला- ये माझ्या गाडीत बस, तुला घरी सोडतो. मग त्याने घरी न नेता गाडी दुसरीकडे वळवून कारमध्ये बलात्कार केला.

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाला अटकही केली आहे. 

 

असे आहे प्रकरण...
- ही घटना बांदाच्या मटौध परिसरातील आहे. आरोपी पूर्व माध्यमिक विद्यालय भुरागढमध्ये सहायक शिक्षकाच्या पदावर कार्यरत आहे.
- पीडित विद्यार्थिनी कांचन (काल्पनिक नाव) म्हणाली, गुरुवारी संध्याकाळी मी बांदाच्या संकटमोचन मंदिरात पूजा करायला गेले होते. पूजा करून मंदिराबाहेर निघाले तेव्हा शाळेतले शिक्षक अरविंद त्यांच्या कारसह उभे होते.

- ते म्हणाले, मी पुढे जाणार आहे, वाटेत तुला तुझ्या घरी सोडतो. गाडीत बसल्यानंतर त्यांनी गाडी बायपासकडे वळवली. मग नंतर सुनसान रस्ता झाल्यावर गाडी उभी करून घाणेरडे काम केले. मग म्हणाले, यातलं कुणाला काही सांगशील तर जीव घेईन."
- मी घरी पोहोचल्या घरच्यांना सर्वकाही सांगून टाकले. यानंतर घरच्यांसोबत पोलिसात जाऊन तक्रार नोंदवली.

 

काय म्हणतात पोलिस?
- सीओ सिटी राघवेंद्रसिंग म्हणाले, अल्पवयीन मुलीवर कारमध्ये बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. पीडितेच्या जबाबावरून तक्रार नोंदवली असून आरोपी शिक्षकाला अटकही केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिक घटनाक्रम, फोटोज व व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...