आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांची मानसिकता हा अत्यंत सखोल अभ्यासाचा विषय आहे. यावर अनेकप्रकारचे संशोधन झाले आहे. अजूनही मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. पण सध्याच्या धावपळीच्या या युगामध्ये पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांतील घटना पाहता लहान मुलांमध्ये टोकाचे पाऊल उचलण्याचे विचार मनात रुजले जात आहेत की, काय असे वाटत आहे. रेयान इंटरनॅशनल स्कूलमधील 11 वीच्या विद्यार्थ्याने सात वर्षांच्या प्रद्युम्नची केलेली हत्या असो, दोन दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील 11 वर्षीय मुलीने 7 वर्षांच्या मुलावर केलेला चाकू हल्ला असो किंवा शनिवारी 12 वीच्या विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकेवर गोळ्या झाडून केलेली हत्या असो. या सर्वांतून शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करणे अत्यंत गरजेचे असल्याचे दिसत आहे. हरियाणात शनिवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपण गेल्या काही महिन्यांतील या दोन घटनांवर एक नजर टाकुयात.
रेयान इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न ठाकूर याच्या हत्येचे प्रकरण गेल्या काही दिवसांत गाजले आहे. सुरुवातीला या प्रकरणी बस कंडक्टर अशोकला अटक झाली होती. पण सीबीआयने तपास करत 11 वीच्या विद्यार्थ्याला दोषी ठरवले. सीबीआयची थेअरी नेमीकी काय होती? आणि त्याबाबत काय प्रश्न उपस्थित झाले.. याबाबत जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.