आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटणा - पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच दैनिक भास्कर टीमने बिहारमध्ये गंगानदीमध्ये प्रत्यक्ष प्रवास करून नदीची सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी पाहणीती आढळलेली परिस्थिती धक्कादायक होती. पावलो-पावली गंगेचत्या दूरवस्थेचे दर्शन झाले. कुठे देवाला भक्तीपोटी अर्पण केलेल्या वस्तुंचा कचरा तर कुठे अवैध खोदकाम आणि कचरा अवैध खोदकाम, फराक्का बंधारे या सर्वामुळे गंगेचा श्वास गुदमरला आहे. वाळू माफिया गंगेच्या प्रत्येक काठावर जणू गंगेच्या शरिरावरील जखमेच्या खपल्या काढताहेत असे जाणवले.
चौसामधून नदी मार्गाकडे पाहिले तर 554 किलोमीटर (झारखंड आणि बंगाल सीमेसह) च्या गंगेचे आतापर्यंत हवाई सर्वेक्षणच झाले आहे. गंगेची खोली पाहायची असेल तर नदीत जाऊन पाहा, असे म्हटले जाते. भास्करने तसेच केले. कडाक्याची थंडी आणि धुक्याच्या वातावरणात प्रथमच आमची टीम 17 दिवसांपर्यंत नावेद्वारे गंगेत राहीली. त्यातून गंगेचे सध्याचे रुप अगदी स्पष्टपणे समोर आले. आता गंगेमध्ये सीवेज नंतर सर्वाधिक घाण आहे ती, श्रद्धेमुळे झालेल्या कचऱ्याचीच. कुठे स्मशान घाट, कुठे मृत जनावरे आणि कुठे फुले-फळे. कोरड्या पडत चाललेल्या गंगेमध्ये काही ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसचे टेकडेही नावेला धडकले. पण नंतर पुढे पुन्हा गंडक, कोसी सारख्या नद्यांच्या संगमामुळे नवीन प्रवाह आणि नवीन जीवन मिळते. यासंपूर्ण प्रवासाचा सिनियर जर्नालिस्ट शशि भूषण आणि फोटो जर्नालिस्ट संदीप नाग यांनी सादर केलेला रिपोर्ट याठिकाणी देत आहोत.
सुरुवात : बिहार मध्ये गंगा
चौसापासून सोन-गंगा संगमाच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत गंगेचे खोरे विस्तारत जाते पण कुठेही बेट मात्र आढळत नाही. डोरीगंजपर्यंत सरकत सरकर पुढे सरकणाऱ्या गंगेला पहिला प्रवाह मिळतो तो शरयूमुळे. शरयूच्या प्रवाहाबरोबर गंगेचा प्रवाच चांगलीच कूस बदलतो. कधी युपीमध्ये तर कधी बिहारमध्ये जमीन झळकते. याच जमिनीवरून दोन्ही राज्यांमध्ये स्वातंत्र्यानंतर आजही वाद कायम आहे.
संगम : पण नदीचे विभाजनही
डोरीगंजच्या तिवारी घाटापासून गंगेच्या प्रवाहाचे विभाजन सुरू होते. नदीच्या मध्ये आढळणारी बेटे इथूनच सुरू होतात. पाटणा-छपराच्या मध्ये सबलपूर, वैशालीच्या राघोपूर, मुंगेरच्या हेमजापूर-जाफरनगर-जमीन डिग्री-तौफीर अशा बेटसृष्य खोऱ्यांचा भाग पुढे झारखंडच्या साहेबगंज आणि कटिहारच्या कारगिरपर्यंत कामय राहतो.
अखेरीस : मरगंगा-गंगहारा
चौसापासून साहेबगंजदरम्यान जागोजागी गंगेचा अंत आणि पराभव झाल्याचा अनुभव येतो. मरगंगा आणि गंगहारा हे शब्दही तसेच सूचक आहेत. मरगंगा म्हणजे गंगेची अशी धारा ती मृत पावली आहे आणि गंगहारा म्हणजे गंगेचा असा प्रवाह जो गंगेच्याच इतर प्रवाहांसमोर दुबळा ठरला आहे. बिहारमध्ये एकच नदीच्या अनेक धारांमध्ये विभाजीत होऊन वाहत राहते.
पुढे सरकलो तसे बदलत गेले गंगेचे स्वरुप
0-100 km : गंगेची एकच धारा पण डोरीगंजच्या तिवारी घाटापर्यंत पोहोचचा पोहोचता 1.5 किमीचा विस्तार वाढून 4 किमीचा होतो.
101-183 km : गंगेच्या प्रवाहाचे विभाजन सुरू होते. बेटे दिसायला लागतात.
184-425 km : गंगा, मरगंगा आणि गंगहारा बनत साहेबगंज पर्यंत पोहोचते. बेटे तयार होतात, खोरे दिसतात. दोन्ही किंवा चारही किनाऱ्यांवर पाण्यामुळे झालेली दगडांची झीज स्पष्ट दिसते.
426-554 km : फरक्कामध्ये गंगेच्या कमरेला दोरखंड बांधल्याप्रमाणे असलेल्या बंधाऱ्यांमुळे गंगेचा जीव गुदमरतो.
कोसी सारख्या नद्यांमुळेच टिकून आहे गंगेतील प्राण
गंगा ज्याठिकाणी बिहारमध्ये प्रवेश करते ती म्हणजे बक्सर जिल्ह्याच्या चौसामध्ये. दुसऱ्या किनाऱ्या पलिकडे उत्तर प्रदेशचा गाजीपूर जिल्हा आहे. येथेत कैमूर डोंगररांगांतून निघणारी कर्मनाशा गंगेत प्रवेश करते. कर्मनाशा रोहतास आणि कैमूरची दुर्गावती, धर्मावती आणि कुदरा अशा नद्यांचे पाणी गंगेत सामावते. येथूनच दैनिक भास्कर टीमची मोटरबोट गंगेत उतरली. नदीमध्ये प्रवाह अगदी नसल्यासारखाच. फार तर 500 मीटर लांबीची गंगा येथे आहे.
या घाटावर राम लक्ष्मण करायचे अंघोळ
- कर्मनाशा-गंगा संगम बक्सरपासून 14 किमी पश्चिमेला आहे. बक्सरच्या रामरेखा घाटाला शाहाबादमदील लोक सर्वात पवित्र स्थान मानतात. येथे राम लक्ष्मण अंघोळीसाठी यायचे असे मानले जाते. रामरेखा घाटाला लागून असलेल्या ताडका नाला मुळे गंगेत घाण पाजी जमा होते. पुढे वीर कुंवर सिंह सेतू आहे. हा पूल बक्सर आणि बलिया ला जोणारा आहे. पुलाच्या पुढे गंगा अगदी शांतपणे पुढे सरकते. कुठे कुठे तर अगदी 100-150 मीटर रुंदीचाच प्रवाह आहे.
- पुलाच्या पश्चिमेला बलियाला जोडणारा पीपा पूल आहे. पीपा पुल आणि सध्या काम सुरू असलेला पूल यांच्यामध्ये तापी आणि राजगुरू ड्रेजर ड्रेजिंग करत आहेत. काम समाप्त झाले आहे. नदीमध्ये 30-35 किमी अंतर पुढे गेल्यानंतर सती घाट आहे. शरयूचे पाणी गंगेचा प्रवाह पुढे सरकवते. हा प्रवास फार तर सहा सात किलोमीटरपर्यंत कामय राहतो. नंतर मंदावतो. आता गंगा भोजपुर आणि छपरामध्ये वाहते आणि अनेक ठिकाणी विविध प्रवाहांमध्ये विभाजित होते.
खोऱ्यात दिसले बंदूकधारी
- खोऱ्यामध्ये एक बंदूकधारी लोकांचा गट दिसला. हा आराचा भाग आहे. रामपूर-बिंदगांवा मौजाजवळ बलवन टोलामध्ये सोन-गंगा संगम आहे. संगमाजवळ काही जमीन पाटणा जिल्ह्याची आहे पण येथे शेती दुसरेच लोक करतात. सोन-गंगेचा जुना संगम दीघा मध्ये होता. सोनमध्ये अगदी तळाला गेलेले थोडे पाणी आहे. मनेरच्या हरदी छपरापासून पूर्वेकडे वीट भट्ट्यांची रांग दिसते. हा शाहपूरचा परिसर आहे. येथून खाली वाहणारी नदी दानापूर आणि दीघाच्या जयप्रकाश सेतूजवळून उत्तरेकडे वळते. पाटणा शहरापासून फार दूर गेली आहे. शहर दिसतही नाही.
- पुढे गंगा उत्तरेकडे वळते. दरियापूरहून पुढे गंगेचा एक लहान प्रवाह फुटतो, त्याला मर-गंगा (मरंगा) म्हणतात. हरोहरचे पाणी मर-गंगेच्या प्रवाहात जीव ओततो. सूर्यगडामध्ये पुन्हा नदी दोन बाजुला विभाजित होते. त्यामुळे निर्माण झालेले एक लांब बेट मुंगेरपर्यंत पसरलेले आहे. मुंगेरच्या पुढे बरहखालच्या नावाने ओखळली जाते तिथपर्यंत प्रवाह आहे. नंतर मधुरापुर मार्गे बिहपूरपर्यंत पोहोचते. बिहपूरपासून ती दक्षिणेकडे साहेबगंजपर्यंत पोहोचते. याठिकाणी लोक गंगेच्या एका प्रवाहाला कलबलिया प्रवाह म्हणतात, त्यात फक्त पावसाळ्यात पाणी येते. गंगेच्या एखा प्रवाहाचे नाव गंगा चरणही आहे.
- अजगैबीनाथ मंदिराच्या उत्तरेला गंगेचा एख प्रवाह जातो. त्याला लोक यमुनिया किंवा जओनिया म्हणतात. येथून पथरघाट पर्यंत नदी दगडांमागून मार्ग काढत पुढे जाते. कुरसेलामध्ये कोसीचा विशाल प्रवाह गंगेत मिसळतो. येथे एका प्रवाहाला गंगा प्रसादही म्हणतात. कुरसेलाच्या कोसी-गंगा संगमानंतर नदी कटिहार, पश्चिम बंगालच्या मालदा, झारखंडच्या साहेबगंजहून फरक्काला पोहोचते. गंगेत गंडक, कोसीचे पाणी मिळते. पुरामुळे नाव खराब झालेल्या या नद्यांमुळेच आज गंगेमध्ये प्राण शिल्लक आहे.
- पाटणाच्या गांधीघाट आणि गायघाट दरम्यान आणि गांधीसेतूच्या पश्चिम संगमाचे अनोखे दृश्य. भारताच्या नकाशासारखी प्रतिकृती दिसते. हिरव्या रंगाचे पाणी असलेली गंगा आणि गंडक यांच्या संगमावर बेटासारखा दिसणारा भाग सारणच्या सबलपूरच्या खोऱ्याचा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.