आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधवांसमोर दोन्ही सुवासिनींना पाकने विधवेच्या रूपात आणले;स्वराज यांचा पाकवर हल्लाबोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी नेटवर्क | नवी दिल्ली
इस्लामाबादेत कुलभूषण जाधव यांच्या मातोश्री व पत्नीशी झालेल्या गैरवर्तनाचा संसदेत सदस्यांनी गुुरुवारी एकमुखाने निषेध केला. पाकविरुद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी केली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत सांगितले की, पाकने दोन्ही सुवासिनींना कुलभूषण यांच्यासमोर विधवेच्या रुपात पाठवले. आईच्या गळ्यात मंगळसूत्र व कुंकू नसल्याचे पाहून आपल्या वडिलांबाबत काही 
अघटित तर घडले नाही, अशी शंका कुलभूषण यांना आली. ‘बाबा कसे आहेत,’ हाच त्यांचा पहिला प्रश्न होता. ही अपमानाची परिसीमा होती. यानंतर संसदेत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ व ‘शेम शेम पाकिस्तान’च्या घोषणा देण्यात आल्या. 
सुषमा म्हणाल्या, पाकने मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे. आई-लेक व पती-पत्नीच्या हृदयस्पर्शी भेटीचा वापर पाकने अपप्रचारासाठी केला. करारात स्पष्ट उल्लेख होता की, माध्यमांना जाधव यांच्या कुटुंबीयांपर्यंत जाऊ दिले जाणार नाही. मात्र मीडियाने त्यांच्या जवळ जाऊन अपशब्दांनी अपमान केला.

 

सरकारी इशाऱ्यावरूनच; पाक पत्रकारांची कबुली
पाक परराष्ट्र मंत्रालयाच्या इशाऱ्यावरूनच हे घडले. खुद्द पाक पत्रकारांनी ही कबुली दिली. ‘डॉन’चे पत्रकार हसन बेलाल झैदी म्हणाले, दोघींचा पाठलाग करण्याची योजना परराष्ट्र मंत्रालयाने आधीच आखलेली होती. नंतर मंत्रालयाने पत्रकारांचे आभारही मानले.

 

> राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनीही पाकिस्तानवर जोरदार टीका केली. पाकिस्तानला लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांना शेजारी देशांबरोबर कसे वर्तन करावे हेही माहिती नाही. पण पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीबरोबर जे वर्तन केले ते कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाबरोबरच घडले नाही, तर भारताच्या 120 कोटी जनतेच्या आई-बहीणींबरोबर हे घडल्याचे आम्ही मानतो. 


सपा खासदारांच्या वक्तव्यावरून गदारोळ 
- सपाचे राज्यसभेतील खासदार नरेश अग्रवाल यांनी बुधवारी जाधव यांच्यासंदर्भात एक लज्जास्पद वक्तव्य केले. ते म्हणाले, पाक जाधवला दहशतवादी समजतो, त्यामुळे त्याच्याशी तसेच वर्तन करत आहे. भारतानेही दहशतवाद्यांबरोबर तसेच वर्तन करायला हवे. या वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर त्यांनी आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे म्हणाले. 
- व्यंकय्या नायडू म्हणाले, जाधव यांच्या आई आणि पत्नीबरोबर पाकचे वर्तन अमानवी होते. त्यामुळे भारताच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भारताला शांती हवी आहे, पण काही देश वेगळाच मार्ग निवडत आहेत. 
- लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पाकने जाधव यांच्या आई आणि पत्नीबरोबर केलेल्या वर्तनाचा निषेध आहे. जाधव यांना लवकरात लवकर देशात आणायला हवे. 

 

पाकिस्तानच्या माध्यमांनी कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला काय विचारले ते वाचण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...