आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्म प्रमाणे आहे ही लव स्टोरी; मुलीला पळवले, लग्न केले, आता मिळाली धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर- एएसपी कार्यालयात शुक्रवारी प्रेम विवाहाचे दोन प्रकरण समोर आले. दोन्ही दोन्ही प्रेमी जोडप्यांनी लग्न केले आहे आणि दोन्ही तरूणींच्या वडिलांनी तरूणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पहिले प्रकरण चाकुलिया येथील आहे. चाकुलिया नमोपाडा कॉलनीत राहणारा वरूण दास 31 ऑक्टोबर 2017 ला मातापूर येथील सुष्मिता महतोला घेऊन पळून गेला. यानंतर तरूणीचे वडिल परिमल महतो यांनी वरुणविरोधात चाकुलिया ठाण्यात लग्न करण्याच्या उद्देशाने अपहण केले असल्याची केस दाखल केली आहे.


असे आहे प्रकरण...
- वरुण-सुष्मिता यांनी 9 जानेवारीला कडगपूरमध्ये कोर्ट मॅरेज केले.
- यापूर्वी 3 नोव्हेंबरला दोघांनी जादूगोडा येथील रंकिणी मंदिरात लग्न केले होते.
- लग्नाचा व्हिडिओ बनवून सुष्मिताने आपल्या घरच्यांना पाठवला होता.
- इकडे, कोर्ट मॅरेजबद्दल कळताच साक्षिदार बनलेले तरूण दास, लक्खी दास, प्रदीप कुमार यांना पोलिासांनी विचारपूस करण्यास सुरूवात केली.
- सुष्मिताने सांगितले की, आजोबांनी दोघांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे.


पोलिसांनी असा केला तपास...
- कोर्टात सुष्मिताचे नातेवाईक आणि गावातील लोक पोहोचले. परिस्थिती खराब होण्याचा अंदाज येताच सामाजिक कार्यकर्त्यात संगीता दोघांना घेऊन एसएसपी कार्यालयात पोहोचल्या.
- एएसपींनी दोघांना लग्नाचे सर्टिफिकेट आणि तरूणीचा सज्ञान असल्याचा पुरावा मागितला. त्यानंतर चाकुलियाच्या पोलिस आधिकारी सुष्मिता यांनी 164 अंतर्गत जबाबा नोंदवून त्यांना निर्दोष सोडून दिले.


पुढील स्लाइडवर वाचा यामुळे घेतला पळून जाण्याचा निर्णय...

बातम्या आणखी आहेत...