आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • ना धमक्यांना भ्यायले, ना जिद्द सोडली; या वकिलाने आसारामला गजाआड करूनच घेतला दम This Is The Lawyer Of The Victim

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ना धमक्यांना भ्यायले, ना जिद्द सोडली; या वकिलाने आसारामला गजाआड करूनच घेतला दम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - पूनमचंद सोलंकी, हे नाव त्या व्यक्तीचे आहे, ज्यांनी आसाराम केसमध्ये पीडितेकडून केस लढली. सोलंकी यांनी फक्त ही केसच लढली नाही, तर पीडितेला न्यायही मिळवून दिला. यादरम्यान त्यांना केस सोडून देण्यासाठी आमिष दाखवण्यात आले, धमक्याही मिळाल्या, परंतु त्यांनी कशाचीच पर्वा केली नाही. यामुळेच आज आसाराम जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. 

 

असा लढला खटला... 
- विशेष म्हणजे आसारामकडून देशातील सुप्रसिद्ध अन् दिग्गज वकिलांनी खटला लढला. या वकिलांमध्ये भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद, राम जेठमलानी आणि केटीएस तुलसी यासारखे दिग्गज सामील होते.
- या वकिलांसमोर पी.सी. सोलंकी यांनी अतिशय मुद्देसूदरीत्या पीडितेची बाजू मांडली आणि न भिता केस निकालापर्यंत नेली.


केस सोडली नाही म्हणून मिळाली जिवे मारण्याची धमकी 
- सोलंकी म्हणाले की, या केसमधून हटण्यासाठी त्यांना निरनिराळी आमिषे देण्यात आली, परंतु त्यांनी केस सोडली नाही, तेव्हा त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. तरीही धमक्यांना भीक न घालता त्यांनी खटला लढला. 
- ते म्हणाले, केसच्या सुनावणीबाबत त्यांना अनेक वेळा दिल्लीला जावे लागायचे. ते दिल्लीमध्ये हॉटेलऐवजी धर्मशाळेत थांबायचे आणि मेट्रोने ये-जा करायचे.
- सोलंकी म्हणाले, केस अनेक दिवस चालावी यासाठी बचाव पक्षाकडून तऱ्हेतऱ्हेच्या क्लृप्त्या वापरण्यात आल्या. दररोज कोर्टात त्यांच्यासमोर एक नवे आव्हान असायचे.
- पूर्ण प्रकरणात त्यांनी पीडितेच्या धाडसाचे कौतुक करून म्हटले की, तिच्या साहसामुळेच आम्हाला न्याय मिळू शकला.


फीस न घेता लढले न्यायाची लढाई...
- सोलंकी म्हणाले, ते जानेवारी 2014 मध्ये या केसशी जोडले गेले होते. तेव्हापासून ते सातत्याने केसची पैरवी करत आहेत. केस जिंकण्याबद्दल ते म्हणाले की, जेव्हा कोर्टाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तेव्हाच त्यांचे समाधान झाले.
- या केससाठी सोलंकी यांनी फीस घेतली नाही आणि आपल्या खर्चाने दिल्ली तसेच इतर जागांवरही गेले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित इतर फॅक्ट्स...

बातम्या आणखी आहेत...