आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • आज आसारामचा फैसला: \'त्या\' रात्री काय घडले, वाचा पीडित मुलीची आपबीती Today Court Will Decide Asaram\'s Fate, You Will Shocked To Know Victims Story Of That Night

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसारामला जन्मठेप: \'त्या\' रात्री काय घडले, वाचा पीडित मुलीची आपबीती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - देशातील सर्वाधिक चर्चित लैंगिक शोषण प्रकरणांपैकी एक असलेल्या आसाराम केसमध्ये बुधवारी जोधपूर जेलमध्ये कोर्टाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून इतर 2 जणांना 20-20 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.  तर 2 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. सुरक्षा पाहून या दिवशी शहरात आसाराम समर्थकांसाठी ‘नो एंट्री’ करण्यात आली आहे. शहराच्या मुख्य रेल्वे स्टेशनवर गुप्तचर संस्था साध्या वेशात नजर ठेवून आहेत. सर्व पोलिस स्टेशन्सच्या पथकांनी सोमवारी होटल्सची दर 4 तासांनी तपासणी करून यात थांबलेल्या लोकांची चौकशी केली. तुरुंगाचा एक हॉल कोर्ट रूमसाठी तयार करण्यात आला.  

 

जोधपूरमध्ये हायअलर्ट : पोलिसांचे बारकाईने लक्ष
- आसाराम समर्थकांची जोधपूरला पोहोण्याची शक्यता पाहून शहराच्या मुख्य रेल्वे स्टेशनसोबतच बासनी, भगत की कोठी आणि राइका बाग स्टेशनवर गुप्तचर संस्था साध्या वेशात नजर ठेवून आहे. यासोबतच मंगळवारी सकाळपासूनच शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर पोलिसांची नाकेबंदी सुरू होऊ शकते. 
- शहरात मंगळवार आणि बुधवारी तब्बल दीड हजारांहून जास्त पोलिस जवान आणि अधिकारी कोपऱ्यानकोपऱ्यावर तैनात राहतील. यासोबतच 5 आरएसीची अतिरिक्त तुकडी, एसटीएफ, हाडी रानी बटालियन, वज्र, वॉटर कॅननही तैनात करण्यात आली आहे.
- दुसरीकडे, पोलिसांनी शहरवासीयांनीही लपूनछपून शहरात राहत असलेल्या आसाराम समर्थकांची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये वा पोलिस कंट्रोल रूममध्ये देण्याची अपील केली आहे.


आतापर्यंतच्या खटल्यातील घडामोडी...
- आसाराम केसमध्ये सर्व सरकारी साक्षीदारांचे जबाब पूर्ण झाले आहेत. बचाव पक्षाकडून अगोदर 100 साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली होती. ती घटवून आता 40 करण्यात आली. नियमित सुनावणी झाल्याने निकालाचा हा दिवस उजाडला आहे.

 

काय होती घटना?
- आसारामच्या गुरुकुलमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आरोप केला की, 15 ऑगस्ट 2013 रोजी जोधपूरच्या जवळील मणाई गावात एका फार्म हाऊसमध्ये तिचे लैंगिक शोषण करण्यात आले.
- 20 ऑगस्ट 2013 ला तिने दिल्लीच्या कमलानगर पोलिसांत आसारामविरुद्ध प्रकरण नोंदवले. जोधपूरचे प्रकरण असल्याने दिल्ली पोलिसांनी प्राथमिक नोंद घेऊन तिला जोधपूरला पाठवले.
- जोधपूर पोलिसांनी आसारामविरुद्ध अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला. 31 ऑगस्ट 2013 रोजी जोधपूर पोलिसांनी इंदूरमधून आसारामला अटक करून जोधपूरला आणले. तेव्हापासून आसाराम जोधपूर जेलमध्येच बंद आहे.
- यादरम्यान त्याच्याकडून उच्चतम आणि उच्च न्यायालयासहित जिल्हा न्यायालयात तब्बल 9 वेळा जामिनासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु जामीन मिळाला नाही.


9 साक्षीदारांवर झाले आहेत प्राणघातक हल्ले
- आसाराम प्रकरणी 9 साक्षीदारांवर प्राणघातक हल्ले झालेले आहेत. यातील दोघांचा मृत्यूही झाला आहे. पीडित मुलीच्या वडिलांना शहाजहांपूर आणि जोधपूरमध्ये लक्ष्य करण्यात आलेले आहे.


10 हजार कोटींचा मालक आसाराम
- आसारामकडे 400 ट्रस्ट आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या पूर्ण साम्राज्यावर त्याचे नियंत्रण होते. आसारामच्या संस्थांकडून विकल्या जाणाऱ्या पत्रिका, प्रार्थना पुस्तके, सीडी, साबण, धूपबत्ती आणि तेल इत्यादी प्रॉडक्टच्या विक्रीतून, श्रद्धावानांच्या देणगीतून, तसेच आश्रमाने हडपलेल्या जमिनीवर शेतीतूनही आश्रमाच्या खजान्यात मोठी रक्कम आली. बेनामी जमिनीचे सौदे आणि तब्बल 2200 कोटी रुपयांहून जास्त रक्कम 500 पेक्षा जास्त लोकांना चढ्या व्याजदराने, तर 1635 कोटी रुपये नगदी कर्ज म्हणून देण्यात आले. अमेरिकी कंपनी सोहम इंक आणि कोस्टास इंकमध्ये 156 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. 8 कोटी रुपयांची रक्कम लाच देण्यासाठी राखीव होती. हा सगळा हिशेब तब्बल 4500 कोटींच्या घरात जातो. परंतु सध्याच्या बाजारातील दरानुसार आसारामचा एकूण गोरखधंदा 10 हजार कोटींहून अधिकच आहे.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, पीडितेने सांगितलेली 'त्या' रात्रीची आपबीती...   

बातम्या आणखी आहेत...