आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • सख्खे भाऊ बहीण बनले IAS: इंटरव्ह्यूत होते हे ट्रिकी प्रश्न: असा कोणता देश आहे, जेथे कचरा नष्ट झालाय? UPSC 2017 Interview Top Tricky Questions And Answers

सख्खे भाऊ-बहीण बनले IAS: इंटरव्ह्यूत होते हे ट्रिकी प्रश्न: असा कोणता देश आहे, जेथे कचरा नष्ट झालाय?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - यूपीएससी-2017 चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात वाराणसीचे रहिवासी दोन सख्खे भाऊ-बहीण प्रवीण सिंह आणि प्रियंका सिंह हेही सिलेक्ट झाले. भावाला 152th, तर बहिणीला 309th रँक मिळाली आहे. शहरातील हंसनगर कॉलनीतील रहिवासी प्रवीण आणि त्यांची मोठी बहीण प्रियंका यांच्या कुटुंबात सध्या उत्सवाचे वातावरण आहे. रेल्वेतून निवृत्त वडील प्रभु नारायण सिंह यांना मुलांच्या यशाच अमाप आनंद झाला आहे. प्रवीण यांनी DivyaMarathi.Com ला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांचा अनुभव आणि मुलाखतीत विचारण्यात आलेल्या काही ट्रिकी प्रश्न व उत्तरे शेअर केली आहेत. 

 

पुढे क्लिक करून, इन्फोग्राफिकमध्ये पाहा मुलाखतीत विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे...


अशी केली प्री, मेन्स आणि मुलाखतीची तयारी
- प्रवीण म्हणाले, 'मी प्री आणि मेन्सचा अभ्यास विभागून केला नाही. दोन्हींची एकत्रच तयारी केली.'
- 'चांगल्या लेखकाचे एक पुस्तक 3 वेळा वाचायचो. मी कधीच वेगवेगळ्या लेखकांचे सारखेच पुस्तक वाचले नाही.'
- 'मेन्ससाठी दररोज 3 तास राईटिंग प्रॅक्टिस करायचो. मी 20 प्रश्नांच्या उत्तरासाठी 9 मिनिटे वेळ धरायचो.'
- 'याशिवाय इंटरव्यूसाठी महत्त्वाची नॅशनल, इंटरनॅशनल न्यूज वाचायचो आणि पाहायचोही.'
- 'सोबतच शहरातची पूर्ण माहिती वाचली होती. शहरात काय आणि कसे सुरू आहे, याची अपडेट माहिती ठेवायचो.'

 

प्रवीण यांचे शिक्षण...
- 2007 मध्ये प्रवीण यांनी शहरातील एका कॉन्व्हेंट शाळेतून माध्यमिक उत्तीर्ण केले. 2009 मध्ये इंटर आणि मग कानपूरच्या इंजीनियरिंग कॉलेजमधून बीटेक कम्प्लिट केले.
- यानंतरच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. हा त्यांचा तिसरा अटेम्ट होता. पहिल्या वेळी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले होते.
- दुसरीकडे, मोठी बहीण प्रियंकाने 2003 मध्ये मॅट्रिक केली. 2005 मध्ये इंटर. मग अलाहाबादच्या मोतीलाल नेहरू इंस्टिट्यूटमधून MBBSची पदवी घेतली.
- मागच्या वेळी प्रियंका यांना 352th रँक मिळाली होती. सध्या त्या कस्टम एक्साइजच्या ट्रेनिंगमध्ये आहेत. तर मोठा भाऊ चेन्नईमध्ये इंजीनियर आहे.

 

पुढे क्लिक करून, इन्फोग्राफिकमध्ये पाहा मुलाखतीत विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे...  

बातम्या आणखी आहेत...