आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • या 8 जणांमुळे आसारामला जन्मठेप, यांच्या साक्षीमुळेच झाला ढोंगी संताचा पर्दाफाश Victim Family And Key Witnesses Who Made Asaram Bapu Verdict Possible

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या 8 जणांमुळे आसारामला जन्मठेप, यांच्या साक्षीमुळेच झाला ढोंगी संताचा पर्दाफाश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसारामला जन्मठेप होण्यात या 8 जणांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. - Divya Marathi
आसारामला जन्मठेप होण्यात या 8 जणांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

जोधपूर - अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषणप्रकरणी आसारामसहित 3 आरोपींना स्पेशल कोर्टाने दोषी ठरवले आहे. आसारामला आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून इतर दोन दोषींना 20-20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निकालाआधीच जोधपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते.

> केसचा खुलासा झाल्याच्या साडेचार वर्षांनी कोर्ट निकालाप्रत पोहोचले. परंतु या केसला शेवटापर्यंत नेण्यामध्ये 8 जणांची भूमिका महत्त्वाची होती. जर हे लोक ठाम नसते तर बहुधा पीडित मुलगी न्यायापासून वंचित राहिली असती.


पहिली महत्त्वाची व्यक्ती - पीडित मुलगी जिने आवाज उठवला
- आसारामला माझे कुटुंब गुरू समजत होते. पूर्ण कुटुंब त्याच्या शरणमध्ये राहायचे, आश्रमात सेवा करायचे. तो सैतान अन् घाणेरडा माणूस निघाला. आसारामने बंद खोलीत दीड तास बळजबरी केली.

 

दुसरे - पीडितेचे वडील
- 11 वर्षे ज्याची देव समजून पूजा केली, त्याने माझ्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य केले. तेथे अनेक मुली आहेत. तो कुणासोबतही रेप करू शकतो, यामुळे आसाराम कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.

 

तिसरी - पीडितेची आई
- एवढा बेशरम आहे आसाराम. बळजबरी केल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणू लागला की, मुलीला आश्रमात पाठवा. नाहीतर तुमची मुलगी आवारा होईल. घरातून पळून जाईल. आम्ही ज्याला संत मानायचो, त्याने माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. 

 

महत्त्वाचे राहिले हे 5 साक्षीदार

पहिला साक्षीदार
"आसारामच्या साधिका तरुणींचे ब्रेनवॉश करून समर्पण करण्यासाठी तयार करायच्या. मग आसाराम त्यांचे लैंगिक शोषण करत राहायचा. तेवढाच रंगेल अन् अय्याश त्याचा मुलगा नारायण साईही होता. आसाराम व नारायणच्या अटकेमुळे भयमुक्त होऊन तो साक्ष देत आहे." 
- महेंद्र चावला (रा. पानिपत) आसारामच्या प्रोडक्ट्सची मार्केटिंग करायचा. 5 सशस्त्र जवान 24 तास त्याच्यासोबत राहायचे. 13 मे 2015 रोजी पानिपतमध्ये गोळी झाडून त्याच्या खुनाचा प्रयत्न झाला. तेव्हापासून पोलिसांच्या सुरक्षेत जगतोय.

 

दुसरा साक्षीदार
"आसारामने मला पीए बनवले होते. यामुळे नारायण साईंच्याही जवळचा होतो. मी अनेकदा बाप-बेट्यांचा रंगेलपणा पाहिला होता. आसाराम गावरान अंडे खायचा, कोंबड्या मागवायचा. लैंगिक शक्तिवर्धक औषधे घेणारा लिंगपिसाट, वासनांध होता. अनेक तरुणींचा त्याने गर्भपातही करायला लावला."

राहुल सचान लखनऊमध्ये राहायचा. बाप-बेट्यांच्या लिंगपिसाटपणाचा तो साक्षीदार होता. 13 फेब्रुवारी 2015 रोजी जोधपूर कोर्टाबाहेर चाकू भोसकून त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला. तेव्हापासून तो गायब आहे.

- कुटुंब वडिलोपार्जित गावी घाटमपूरमध्ये राहते. तेथील पोलिस स्टेशनचे इंचार्ज अमित कुमार सिंह म्हणाले की, त्यांना केसची माहिती नाही, म्हणून कुणालाही सुरक्षा दिलेली नाही. सचान ठाकूरगंज लखनऊमध्ये किरायाच्या घरी राहायचा, तेथील एसओ म्हणाले की, तो 4 वर्षांपासून बेपत्ता आहे, त्याचा ठावठिकाणा नाही, कुणाला सुरक्षा द्यावी.

 

तिसरा साक्षीदार
- हिसारचा रहिवासी अजयकुमारने जोधपूरमध्ये मॅजिस्ट्रेटसमोर जो जबाब दिला, तो चारही प्रमुख साक्षीदारांवर झालेल्या हल्ल्याला सपोर्ट करतो. अजयही समर्पित साधक होता. साईची सीआयडी करणाऱ्या नरेशला ऋषिकेशमध्ये बुडवून ठार मारण्यात आले. 2 महिन्यांनीच साधक रेंवाभाईचा संशयास्पदरीत्या अपघातात मृत्यू झाला. एका साधिकेचा प्रियकर दिनेशनेही संशयास्पदरीत्या आत्महत्या केली. या सर्व हत्याच होत्या, कारण नारायण साईच्या चेल्यांनी त्यालाही उलटे लटकवून मारहाण केली आणि बेशुद्ध झाल्यावर उदयपुरात फेकून दिले.
- पोलिस स्टेशन आझादनगर, हिसारचे PSI पवन कुमार म्हणाले की, कोणीही सुरक्षा मागितली नाही. कुणावरच हल्लाही झाला नाही. आसाराम केसशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुरक्षा दिलेली नाही.

 

चौथा साक्षीदार
- "आसाराम लैंगिक शक्तिवर्धक औषधे घ्यायचा. त्याच्या अय्याशीचा मी साक्षीदार आहे. बलात्कारानंतर आसाराम म्हणायचा की, तो महिलांचे कल्याण करत आहे. मी माझ्यासारखेच अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे नाव-पत्ते आणि पुरावे पोलिसांना दिले होते." 
- अमृत प्रजापति अहमदाबादच्या फ्लॅटमध्ये राहायचा आणि आसारामचा वैद्य होता. 23 मे 2014 रोजी राजकोटमध्ये अमृतवर गोळी झाडण्यात आली. कुटुंबाला कोणतीही सुरक्षा नाही. -ओढ़व पुलिस, अहमदाबाद.

 

पाचवा साक्षीदार
- जखमी अवस्थेत कृपालसिंहने यूपी पोलिसांना सांगितले होते की, जोधपूर केसमध्ये साक्ष दिल्याने आसारामचे साधक परिणाम भोगण्याच्या धमक्या देत होते. त्याने फक्त एवढाच जबाब दिला की, शाहजहांपूरचा आसारामचा आश्रम पीडितेच्या वडिलांच्या पैशांनी बनलेला आहे.
- कृपालसिंह शाहजहांपूरमध्ये राहायचा. पीड़ितेच्या वडिलांचा मित्र होता. 10 जुलै 2015 रोजी शाहजहांपूरमध्ये त्याच्यावर भररस्त्यावर गोळी झाडण्यात आली. कुटुंबाला कोणतीही सुरक्षा नाही. - सिटी पुलिस, शाहजहांपूर.

 

आसारामविरुद्ध साक्ष देणाऱ्यांना झाला प्रचंड त्रास 
- जोधपूर कोर्टात जबाब देण्यासाठी आलेला साक्षीदार राहुल सचानवर चाकूहल्ला झाला होता. तो तेव्हापासून गायब आहे. त्याचे कुटुंब यूपीच्या निमधा गावात राहते. तेथील पोलिस म्हणतात की, साक्षीदारच नाहीये, तर कुणाला सुरक्षा द्यावी? कुटुंबीयांना देण्यात अर्थ नाही.
- हिसारमधील रहिवासी अजय कुमारला यामुळे सुरक्षा देण्यात आली नव्हती, कारण त्याच्यावर हल्ला झाला नाही.
- दुसरीकउे अहमदाबादचे अमृत प्रजापती आणि शाहजहांपूरचेच कृपालसिंह हेही या केसचे मुख्य साक्षीदार होते. त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. दोघांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी निकालाआधी सुरक्षा दिली नाही. सर्वांचे कुटुंबीय निकालावरून साशंक होते, त्यांचे म्हणणे होते की, आसारामला शिक्षा झाल्यास चिडलेले भक्त हल्ला करू शकतात आणि सुटका झालीच तर बदला घेण्यासाठी हल्ला होऊ शकतो.
परंतु तसे झाले नाही, आणि आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. इतर दोन दोषींनाही 20-20 वर्षांच्या कैदेची शिक्षा झाली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाशी संबंधित फोटोज व FACTS... 

बातम्या आणखी आहेत...