आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मला \'त्या\' वासनांधापासून वाचवा\'; 40 वर्षीय विधवेची पोलिसांत धाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - महिला पोलिस स्टेशनमध्ये 40 वर्षीय एका विधवेने तक्रार दाखल केली आहे की, एक व्यक्ती 27 वर्षांपासून तिचे शारीरिक शोषण करत आहे. मला त्या वासनांधापासून मुक्ती द्या. अनेकदा विरोध केला, पण तो नेहमी मला धमकी देत राहिला. संबंध तोडले तरीही तो मला सातत्याने त्रास देत आहे.  

 

13 वर्षांची होते, तेव्हापासून सुरू आहे शोषण...
शहरातील जामनगर रोडवरील रहिवासी 40 वर्षीय विधवेने महिला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ती म्हणाली- ललित राठौरने 27 वर्षे तिचे शारीरिक शोषण केले आहे. ती जेव्हा 13 वर्षांची होती, तेव्हापासूनच त्याने प्रेमाचे नाटक केले. यादरम्यान तो तिला दीव, दमन, जुनागढ या ठिकाणी हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक शोषण केले. या सर्व ठिकाणी त्याने बळजबरी शारीरिक संबंध बनवले.

 

लग्नानंतरही सुरू राहिले शोषण
महिलेच्या तक्रारीनुसार, यादरम्यान तिचे लग्न झाले. यानंतरही त्याने तिचा पिच्छा सोडला नाही. कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तो तिला बाहेर घेऊन जायचा आणि शोषण करायचा. 2008 मध्ये तिच्या पतीची हत्या झाली. ती विधवा झाल्यावर त्याच्यासाठी रस्ता मोकळाच झाला. कधी सहानुभूतीच्या बहाण्याने तर कधी दुसऱ्या बहाण्याने तो घरी यायचा आणि संबंध बनवायचा.

 

विरोध केल्यावर द्यायचा धमकी
महिलेने सांगितले, मी अनेकदा त्याचा विरोध केला, तेव्हा त्याने मला भीती घालून, धमकावून आपली इच्छा पूर्ण केली. त्याचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच गेले. आता हे सर्व सहन करण्यापलीकडे गेले. माझी काहीही करून त्याच्यापासून सुटका करा. यावर पोलिसांनी महिलेची एफआयआर दाखल केली आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफ्समधून या प्रकरणाची माहिती...

बातम्या आणखी आहेत...