आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडाच्या भीतीमुळे विवाहितेने 15 दिवस घरात घेतले कोंडून, 2 वर्षांपासून जगतेय एवढ्या दहशतीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहजहांपूर(यूपी) - येथे एका गुंडाने विवाहितेला बळजबरी पत्नी बनवण्यासाठी दबाव टाकला. पीडिता म्हणाली, 2 वर्षांपासून तो त्रासा देत आहे. विरोध केल्यावर तिला मारहाण केली जाते. अनेक वेळा बलात्काराचा प्रयत्नही त्याने केलेला आहे. याच गुंडाच्या दहशतीमुळे महिलेने तब्बल 15 दिवस स्वत:ला घरात बंद करून घेतले. शेवटी लपूनछपून शुक्रवारी ती महिला जिल्हा कलेक्टोरेट ऑफिसात गेली आणि आपले दु:ख त्यांना सांगितले. तक्रार देताना विवाहिता आपल्या छळाची हकिगत सांगताना ढसढसा रडत होती. 

 

4 वेळा गेली पोलिसांत, पण लिहिली नाही FIR..

- ही घटना मदनापूरची आहे. येथील पीडिता संगीता (काल्पनिक नाव) ही पती सुमीत (काल्पनिक नाव) तसेच दोन मुलासोबत राहते.
- पीडिता म्हणाली, ''माझ्या परिसरात राहणारा गुंड जौहरी 2 वर्षांपासून त्रास देत आहे. त्याला मला बळजबरी आपली पत्नी बनवायचे आहे.'' 
- ''विरोध केल्यावर तो भररस्त्यात मारहाणही करतो. जेव्हा माझ्या दोन्ही मुलांनी त्याला रोखले तेव्हा त्याने त्यांनाही बेदम मारहाण केली. मागच्या 2 महिन्यांपासून त्याने माझ्या कुटुंबाला जगणे अवघड करून ठेवले आहे.''
- ''यादरम्यान 4 वेळा पोलिसांत तक्रार करायला गेले, पण तेथून आम्हाला हाकलण्यात आले. गावातला गुंड असल्याने आमची कुणीही मदत करत नाही.'' 
- ''याच कारणामुळे मागच्या 15 दिवसांपासून घराबाहेर निघालेले नाही. आज कशीबशी पतीसोबत घरातून निघून कलेक्टर ऑफिसमध्ये आले आहे.''  
- ''जहर 3 दिवसांत त्या गुंडाविरुद्ध काही कारवाई झाली नाही, तर कलेक्टरच्या गेटवरच विष प्राशन करून कुटुंबासह आत्महत्या करीन.''

 

काय म्हणतात पोलिस?
- एसओ इश्तेखार अहमद म्हणाले, ''आतापर्यंत पोलिस स्टेशनमध्ये अशी कोणतीही महिला आली नाही. हे प्रकरण आजच कळले आहे. एखादी तक्रार आली तर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. जर नाही आली तर महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला जाईल.''

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे फोटोज व इन्फोग्राफिक्स...

बातम्या आणखी आहेत...