आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • असे आहेत भोंदू बाबांचे डोकं सुन्न करणारे कारनामे You Will Shocked To Know About These Fake Indian Babas Who Involved In Crime Against Women

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असे आहेत भोंदू बाबांचे डोकं सुन्न करणारे कारनामे; काहींनी केला रेप, काहींनी त्याहून घृणास्पद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - 2013 लैंगिक शोषणाच्या प्रकरणात स्पेशल कोर्टाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यासोबतच त्याचे दोन राजदार शिल्पी आणि शरतचंद्रला कोर्टाने 20-20 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणातील इतर दोन आरोपी- आसारामचा प्रमुख सेवेकरी शिवा आणि आश्रमाचा स्वयंपाकी प्रकाश द्विवेदी यांची कोर्टाने मुक्तता केली आहे. तथापि, साडे चार वर्षांपासून जोधपूरच्या तुरुंगात बंद आसारामविरुद्ध आपल्याच शिष्येचे लैँगिक शोषण केल्याचा आरोप होता. ​पॉक्सो अॅक्टअंतर्गत हा ऐतिहासिक निकाल आहे. 

> दरम्यान, गतवर्षी राम रहीमपासून ते बाबा वीरेंद्र दीक्षितपर्यंत अनेक भोंदू बाबांचा पर्दाफाश झाला होता. गतवर्षी अलाहाबादच्या अखिल भारतीय आखाडा परिषदेने राधे माँसह 14 भोंदू बाबांची लिस्ट जारी केली होती. यासोबतच आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी असेही म्हणाले होते की, हे लोक धर्माच्या नावावर लोकांची फसवणूक करण्याचे काम करत आहेत. DivyaMarathi.Com वाचकांना भोंदू बाबांचे कारनामे आणि त्यांचे सत्य सांगत आहे.

 

आखाडा परिषदेने जारी केलेली भोंदू बाबांची लिस्ट

1) आसाराम बापू ऊर्फ आसुमल हिरूपलानी
2) राधे मां ऊर्फ सुखविंदर कौर
3) सच्चिदानंद गिरी ऊर्फ सचिन दत्ता
4) गुरमित राम रहीम, डेरा सच्चा, सिरसा
5) ओम बाबा ऊर्फ विवेकानंद झा
6) निर्मल बाबा ऊर्फ निर्मलजित सिंह
7) इच्छाधारी भीमानंद ऊर्फ शिवमूर्ती द्विवेदी
8) स्वामी असीमानंद
9) ओम नमःशिवाय बाबा
10) नारायण साईं- आसारामचा मुलगा
11) रामपाल
12) कुशमुनी
13) स्वामी बृहस्पती गिरी
14) मलखान गिरी

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, भोंदू बाबांचे डोळे उघडायला लावणारे कारनामे 

बातम्या आणखी आहेत...