आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: कर्नाटकी मंत्र्याचा हट्ट मला इनोव्हा नको फॉर्च्यूनर हवी, मी मंत्री आहे हे लोकांना कसे कळेल? Innova Not Good Enough For Kar Minister Wants Fortuner

कर्नाटकी मंत्र्याचा हट्ट- मला इनोव्हा नको फॉर्च्यूनर हवी, मी मंत्री आहे हे लोकांना कसे कळेल?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री बी. जे. जमीर अहमद खान यांनी सरकारला इनोव्हाऐवजी फॉर्च्यूनरची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, लहानपणापासून लक्झरी कारमध्ये फिरतोय, यामुळे इनोव्हा त्यांच्यासाठी आरामदायक ठरणार नाही. शिवाय इनोव्हा वापरल्याने लोकांना समजणार नाही की ते मंत्री आहेत.

अहमद खान राज्याच्या मोठ्या व्यावसायिक कुटुंबातील आहेत. त्यांना विचारण्यात आले की, ते मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याप्रमाणे आपल्या खासगी कारमधून का जात नाहीत? यावर ते म्हणाले, "मी मंत्री आहे लोकांना कळावे यासाठी मला सरकारी वाहन पाहिजे. छोट्या कारमधून लोकांमध्ये गेलो तर ते मला ओळखणारच नाहीत."

 

कांग्रेसने केला जमीर यांचा बचाव: 
काँग्रेस राज्यसभेचे खासदार नासिर हुसैन म्हणाले की, एक मंत्री आप्या पसंतीची कार मागतोय, यात काहीही चुकीचे नाही. मीडिया बिनमहत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत आहे. दुसरीकडे, भाजप प्रवक्ते एसपी प्रकाश म्हणाले की, खान यांच्याकडे 100 हून जास्त लक्झरी बसेस आहेत. खान यांनी आपली ऐशोआरामी सवय सोडून जनतेबद्दल विचार केला पाहिजे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...