आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • B\'day किरण बेदी: भारताच्या पहिल्या IPSचा असा होता संघर्ष Inspiring Story Of Indias First Lady IPS Officer Kiran Bedi

B\'day: किरण बेदींचे ब्रीज बेदींशी असे जुळले बंध रेशमाssचे, भारताच्या पहिल्या महिला IPSचा असा होता संघर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या पहिल्या महिला IPS किरण बेदी. सध्या पाँडेचेरीच्या नायब राज्यपाल पदावर कार्यरत आहेत. - Divya Marathi
भारताच्या पहिल्या महिला IPS किरण बेदी. सध्या पाँडेचेरीच्या नायब राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

स्पेशल डेस्क- किरण बेदी यांचा जन्म 9 जुन 1949 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांच्या पतीचे नाव ब्रीज बेदी असून त्यांना सैना नावाची एक मुलगी आहे. अमृतसरच्या गर्व्हनमेंट कॉलेज फॉर वुमन येथून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर चंदिगड येथील पंजाब विद्यापिठातून सोशल सायंसमध्ये मास्टर्स पूर्ण केले. 1988 मध्ये दिल्ली विद्यापिठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर सोशल सायंसमध्ये डॉक्टरेट मिळवली. यावेळी त्यांचा विषय 'ड्रग्ज, अब्युज अॅण्ड डोमॅस्टीक व्हायलंस' हा होता. 

 

लव्ह स्टोरी
पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या पतीचे नाव ब्रीज बेदी आहे. विशेष म्हणजे ब्रीज यांना किरण यांनी प्रपोज केले होते. किरण यांच्या मुलिचे नाव साइना असून ती सामाजिक कार्यात आहे. ती एक एनजीओही चालवते. तिने एका कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीने किरण बेदी यांच्या पुस्तकावर 'गलती किसकी है' ही सिरिअल काढली होती.

 

भारताच्या पहिल्या महिला IPS
प्रोफेसर म्हणून करिअरची सुरवात करणाऱ्या किरण बेदींनी पहिल्या महिला आयपीएस होऊन शिस्तबद्धपणे कायदा आणि सुव्यवस्था राबवून दाखविला होता. यावेळी त्यांनी राजकीय दबावापुढे जराही माघार घेतली नाही. एक कठोर पोलिस अधिकारी अशी त्यांनी ख्याती होती. तिहार तुरुंगात अधिकारी असतानाही त्यांनी अनेक योजना यशस्वीपणे राबवून दाखविल्या.
साइना ही किरण बेदी यांची कन्या. साइनाने अनेक शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यावर तिचा भर असतो. तिने घरीच कार्यालय सुरु केले आहे. तिचे लग्न रुजबेह यांच्यासोबत झाले आहे. ते एक पत्रकार आणि लेखक आहेत. त्यांची आतापर्यंत अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहे. 

 

कारकीर्द
किरण बेदी यांनी अमृतसरच्या खालसा कॉलेज फॉर वुमनमध्ये पोलिटिकल सायंसच्या लेक्टरर म्हणून नोकरीला सुरवात केली. 1972 मध्ये त्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी झाल्या. पोलिस रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी प्रधान संचालक हे पद भूषविले आहे. डिसेंबर 2007 मध्ये त्यांनी आयपीएसमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली.
टीव्हीवरील प्रसिद्ध रियालिटी शो "आप की कचेरी" मध्ये किरण बेदी यांनी न्यायाधीश आणि अॅंकरची भूमिका बजावली. यात रिअल लाईफ भांडणांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असे. त्यांनी नवज्योती दिल्ली पोलिस फाऊंडेशनची स्थापना केली होती. त्यानंतर 2007 मध्ये या संस्थेचे नामकरण नवज्योती इंडिया फाऊंडेशन असे करण्यात आले. बेदी यांना 1994 मध्ये रमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले. किरण बेदी यांची www.kiranbedi.com ही स्वतंत्र वेबसाईटही आहे.

 

आयुष्यावर चित्रपट अन् पुस्तकेही...
ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माता मेगन डोनेमन यांनी किरण बेदी यांच्या जिवनावर Yes Madam, Sir हा चित्रपट तयार केला आहे. 2006 मध्ये नॉर्वेची एमपॉवर फिल्म अॅण्ड मीडिया आणि फिल्ममेकर ओयस्टीन राक्केनेस यांनी त्यांच्या आयुष्यावर डॉक्युमेंटरी काढली होती. Carve Your Destiny या चित्रपटातही किरण बेदी झळकल्या होत्या. 2009 मध्ये Kannadada Kiran Bedi हा कन्नड भाषेत त्यांच्या आयुष्यावर तयार केलेला फिक्शनल चित्रपट आला होता. I dare!: Kiran Bedi : a biography by Parmesh Dangwal आणि Kiran Bedi, the kindly baton by Meenakshi Saxena या किरण बेदी यांच्या बायोग्राफी प्रसिद्ध झाल्या आहेत. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, किरण बेदी यांचे काही Unseen Pics... 

 

बातम्या आणखी आहेत...