आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात प्रथमच इन्स्टाग्राम पुरस्कार घोषित; विराट ठरला सर्वात व्यग्र सेलिब्रिटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फोटो शेअरिंग अॅप्लिकेशन इन्स्टाग्रॉमने भारतात पहिल्यांदा इन्स्टाग्राम पुरस्काराची घोषणा केली आहे. विराटला सर्वात व्यग्र सेलिब्रिटी (मोस्ट एंगेज्ड सेलिब्रिटी) म्हणून निवडण्यात आले. विराटने केलेल्या पोस्टवर नेटिझन्स सर्वाधिक लाइक आणि कमेंट करतात. अनुष्कासोबत ११ डिसेंबरला झालेल्या विवाहाचा फोटो विरोटने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्याला ४५ लाखांवर लाइक्स आणि दीड लाखापर्यंत कमेंट आल्या होत्या.  


काही दिवसांनंतर विराटने अनुष्कासोबत आणखी एक फोटो शेअर केला होता. त्याला ३३ लाख लोकांनी पसंत केले. या पोस्टमुळेच विराट इन्स्टाग्रामवर सर्वात व्यग्र सेलिब्रिटी ठरला. मागील वर्षी फोर्ब्जने जारी केलेल्या अहवालानुसार इन्स्टाग्रामवरील एका पोस्टवर विराटला जवळपास ३.२ कोटी मिळतात. पोस्टवरील वापरकर्त्यांची व्यग्रता आणि जाहिरातीच्या माध्यमातून ही कमाई केली जाते. सोशल मीडियाद्वारे केल्या जाणाऱ्या कमाईत विराट भारतात सर्वात महाग खेळाडू ठरला आहे.

 

दुसरीकडे अभिनेत्री दीपिका पदुकोनचे इन्स्टाग्रामचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. दीपिकाचे २ कोटी २४ लाख फॉलोअर्स आहेत. २ कोटी २१ लाख फॉलोअर्ससह प्रियंका चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूरचे इन्स्टाग्रामवर २ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्या दोघींना पुरस्कार देण्यात आला. विराटचे एकूण १ कोटी ९८ लाख फॉलोअर्स आहेत. इतर देशांमध्येही इन्स्टाग्राम अशा प्रकारचे पुरस्कार देत आहे. भारतात इन्स्टाग्रामचे युजर्स वाढत असल्याने पहिल्यांदाच हा पुरस्कार घोषित करण्यात आला. जगात इन्स्टाग्रामचे जवळपास ८० कोटी युजर्स आहेत. यातील जवळपास पाच कोटी युजर्स एकट्या भारतात आहेत.

 

एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ३.२ कोटींची कमाई 

- विराटच्या ११ डिसेंबरच्या पोस्टवर ४५ लाख लाइक्स

- एका पोस्टसाठी विराटला मिळतात ३.२ कोटी रुपये

- १ जानेवारीच्या पोस्टवर विराटला ३३ लाख लाइक्स मिळाले

 

जगात सर्वाधिक फॉलोअर्स इन्स्टाग्रामचेच

- 23.30 कोटी इन्स्टाग्राम
- 13.41 कोटी सेलेना गोम्ज
- 12.20 कोटी क्रिस्टियानो रोनाल्डो

 

बातम्या आणखी आहेत...