आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • डाव कर्नाटकी: बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजप वापरू शकते ही युक्ती Interesting Prediction How BJP Will Defeat Congress JDS Alliance And Pass In Karnataka Assembly Floor Test

8 वर्षांपूर्वी 16 आमदारांना अपात्र ठरवून येड्डी सरकार वाचवणारे बोपय्याच घेणार अाज परीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांना शनिवारी सायंकाळी ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. राज्यपालांनी दिलेली १५ दिवसांची मुदत कोर्टाने रद्द केली.बहुमत सिद्ध करेपर्यंत येड्डींना धोरणात्मक निर्णय घेण्यावर व अँग्लो इंडियन सदस्य नेमण्यासही कोर्टाने मनाई केली.

 

बहुमत चाचणी प्रोटेम स्पीकर (हंगामी अध्यक्ष) घेतील. कोर्टाच्या आदेशानंतर काही तासांत राज्यपाल वजुभाई  वाला यांनी भाजपचे आमदार के. जी. बोपय्या यांना प्रोटेम स्पीकर नेमले. ऑक्टोबर २०१० मध्ये विधानसभा अध्यक्ष असताना बोपय्या यांनी भाजपच्या ११ बंडखोर व पाच अपक्ष आमदारांना अपात्र ठरवून येड्डी सरकार वाचवण्यास मदत केली होती.

 

नंतर सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला होता. दरम्यान, बोपय्यांना प्रोटेम स्पीकर नेमताच याविरुद्ध काँग्रेसने रातोरात सुप्रीम कोर्टात दाद मागितली. यावर शनिवारी सकाळी १०.३० वा. सुनावणी होईल. यावर भाजपने दावा केला आहे की, १० वर्षांपूर्वी २००८ मध्ये बोपय्या प्रोटेम स्पीकर होते. साधारणपणे सर्वात ज्येष्ठ आमदारास प्रोटेम स्पीकर म्हणून नेमले जाते. काँग्रेस आ. आर. व्ही. देशपांडे यांचे नाव या पदासाठी चर्चेत होते.

 

सुप्रीम कोर्टाने राज्यपालांवर ताशेरे ओढत म्हटले आहे की, घटनात्मक अधिकाराचा राज्यपालांनी चुकीच्या पद्धतीने वापर केला. यावर १० आठवड्यांनी विचार होईल.

 

८ वर्षांपूर्वीची ही स्थिती पुन्हा येऊ नये म्हणजे मिळवले!

हे छायाचित्र १२ ऑक्टोबर २०१०चे आहे.  कर्नाटकात तेव्हा पण भाजप सरकार होते. येदियुरप्पाच मुख्यमंत्री आणि बोपय्या अध्यक्ष. येड्डींना मदत करण्यासाठी बोपय्यांनी १६ आमदारांना अपात्र ठरवले होते. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. १३ मे २०११ रोजी निकालात कोर्ट म्हणाले, ‘बोपय्यांनी पक्षपातीपणाने निर्णय घेतला. त्यांनी न्यायतत्त्वाचेच उल्लंघन केले आहे.’

* आज ती स्थिती निर्माण होऊ नये म्हणजे झाले.

 

सर्वच पक्षांचा एकमेकांवर अाराेप
* भाजप नेते प्रीतम गाैडांनी सांगितले, येदियुरप्पांना पाठिंब्यासाठी अापण जेडीएस अामदारांच्या संपर्कात अाहाेत.
* कुमारस्वामी म्हणालेे- भाजपने दाेन अामदारांना पळवून नेले अाहे, मात्र ते अामच्यासाेबत राहतील असा विश्वास अाहे.
* काँग्रेसचा अाॅडिअाेद्वारे अाराेप- भाजप नेते जनार्दन रेड्डी यांनी अामच्या अामदारांना अामिषे दाखवली अाहेत.

 

... सरकार कसे वाचेल?
सभागृहात एकूण सदस्य २२० आहेत. १११ वर बहुमत होईल. ८ विरोधी आमदारांना येड्डींना मत द्यावे लागेल किंवा काँग्रेस-जेडीएसच्या १५ आमदारांना गैरहजर राहावे लागेल किंवा राजीनामा द्यावा लागेल. २०५ आमदारांत बहुमताचा आकडा होईल १०३. प्रोटेम स्पीकर झाल्याने भाजपची सदस्य संख्या १०३ आहे. 

 

सुनावणीच्या वेळी न्या. सिकरींनी एेकवला विनाेद..
व्हाॅट‌्सअॅपवर एक विनाेद वाचला... बंगळुरूच्या रिसाॅर्ट मालकाने राज्यपालांना फाेन केला. म्हणाले- माझ्याकडे ११७ अामदार अाहेत अाणि अापण सत्ता स्थापन करू इच्छिताे. काय, राज्यपाल रिसाॅर्ट मालकाला सरकार बनवण्यासाठी बाेलावतील?’
 -न्यायमूर्ती ए.के. सिकरी

 

 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कर्नाटक निकालाचे आणखी इन्फोग्राफिक्स...

 

बातम्या आणखी आहेत...