आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबोकारो (झारखंड) - इंटरनॅशनल फुटबॉलर आणि आजसूचे सेंट्रल सेक्रेटरी अजय सिंह यांनी व्हॅलेंटाइन डेच्या रात्री दोन जणांवर गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्यावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आहे की अजयला शंका होती की त्याची पत्नी एंजलाचे त्याच्या मित्रासोबत अफेअर सुरु आहे. या शंकेला व्हॅलेंटाइन डेला एका घटनेने हवा मिळाली आणि त्यानंतर अजयने गोळीबार केला. यात एकाचा मृत्यू झाला आहे. इंटरनॅशनल फुटबॉलर अजयची पत्नी एंजेला ही देखील आतंरराष्ट्रीय पातळीवरील तिरंदाज आहे.
काय झाले होते व्हॅलेंटाइन डेला...
- अजयच्या पत्नीने व्हॅलेंटाइन डेला दोन शर्ट खरेदी केले होते. त्यातील एक शर्ट तिने अजयला गिफ्ट केले. दुसरे शर्ट कोणासाठी या अजयच्या प्रश्नावरुन दोघांमध्ये भांडण झाले.
- अजय आणि एंजेला यांच्यातील भांडणामुळे एंजेला घर सोडून निघून गेली.
- पत्नीचा शोध घेत अजय सेक्टर-9 येथील स्ट्रिट क्रमांक तीन येथे पोहोचला. तो तिला घरी घेऊन जात होता. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा एकदा जुंपली. दोघांमध्ये बरीच खडाजंगी झाली.
- दोघांचे फॅमिली फ्रेंड सुनील गुप्ता आणि अमरेंद्र सिंह उर्फ अप्पू तिथे पोहोचले. त्यांनी पती-पत्नीचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.
- मात्र शंकेचे भूत डोक्यावर चढलेल्या अजय सिंहला पती-पत्नीच्या भांडण्यात मित्रांचा हस्तक्षेप खटकला. रागारागत त्याने सुनील गुप्ता आणि अप्पूवर गोळीबार केला.
- सुनील गुप्ताच्या डोक्यात गोळी लागली तर अप्पूच्या मांडीमध्ये गोळी घुसली.
- यानंतर अजय सिंह, सुनीलला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांनी सुनीलला तपासून मृत घोषित केले. इंटरनॅशनल फुटबॉलर अजयसिंह तिथूनच फरार झाला.
- पोलिसांचे म्हणणे आहे की एंजेला आणि अप्पूने त्यांच्या अफेअरली अद्याप कबूली दिलेली नाही.
रस्त्यात भेटली एंजेला, सांगितले पतीने खूप मारले
- अमरेश उर्फ अप्पूवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्याने सांगितले, 'बुधवारी रात्री 10.30 वाजता मी मित्र सुनील गुप्तासोबत चार स्ट्रिटकडे जात होतो. रस्त्यात एंजेला भेटली. तिने सांगितले की पतीने खूप मारहाण केली. तो माझ्यावर शंका घेत आहे. त्याचे म्हणणे आहे की आपल्या दोघांचे (एंजेला आणि अप्पू) अफेअर आहे. त्यासोबत ती म्हणत होती की आता परत पतीकडे जाणार नाही. ती माहेरी मणिपूरला जाणार होती. तेव्हाच अल्टो कार घेऊन अजय सिंह तिथे दाखल झाला. तो एंजेलाला बळजबरी कारमध्ये बसवत होता. तिला कारमध्ये ढकलत होता.'
आरोपी अजय म्हणाले- माझी पत्नी आहे, मारेल नाही तर कापून फेकेल! तुला काय करायचे?
- अमरेश उर्फ अप्पूने सांगितल्यानुसार, जेव्हा मी अजयला विचारले की असे का करत आहे. तेव्हा तुझी औकात काय मला थांबवण्याची. माझी पत्नी आहे तिच्यासोबत काय करायचे हे मी ठरवले. मी तिला कापून टाकेल नाही तर मारून टाकेल. मला थांबवणारा तू कोण? तेव्हा एंजेला त्याच्यासोबत जाण्यास नकार देत होती. मी जेव्हा त्याला तिच्यासोबत जबरदस्ती करु नको म्हटले तेव्हा त्याने थांबा तुम्हाला दाखवतो, असे म्हणत कमरेला लावलेली रिव्हॉल्व्हर काढली आणि फायरिंग केले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, महेंद्रसिंह धोनी पासून सुनील छेत्रीपर्यंत अजय सिंहचे फोटो...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.