आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल यांची 18 मे रोजी चौकशी, मुख्य सचिवांना मारहाण केल्याचे प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्य सचिव अंशू यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणात दिल्ली पोलिस १८ मे रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करणार आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त (उत्तर) हरेंद्र सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

 

सिंह म्हणाले की, पोलिस या प्रकरणी चौकशी करण्यासाठी सकाळी ११ वाजता तुमच्याकडे येतील, असे केजरीवाल यांना नोटिशीत सांगण्यात आले आहे. चौकशीसाठी स्थान निश्चित करण्याचा पर्याय केजरीवाल यांना देण्यात आला आहे.
हे प्रकरण १९ फेब्रुवारीचे आहे. पोलिसांनी या प्रकरणी आम आदमी पक्षाच्या ११ आमदारांची चौकशी केली आहे. मुख्य सचिवांना जेव्हा मारहाण झाली तेव्हा मुख्यमंत्री निवासस्थानी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि केजरीवाल यांचे माजी सल्लागार व्ही. के. जैन हेही उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...