आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटरला टीममध्ये घेण्यासाठी केली वेश्यांची मागणी, राजीव शुक्लांच्या Assistant वर आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन प्रीमियर लीग (IPL) चेअरमन राजीव शुक्ला यांचा कार्यकारी सहाय्यक मोहम्मद अकरम सैफी विरोधात गंभीर आरोप लागले आहेत. राज्य स्तरीय टीममध्ये उत्तर प्रदेशच्या एका खेळाडूला टीममध्ये घेण्याच्या बदल्यात त्याने तरुणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असा आरोप आहे. एका हिंदी न्यूज चॅनलने बुधवारी हा खुलासा केला. त्यानुसार, अकरमने केवळ वेश्याच नव्हे, तर पैश्यांची देखील मागणी केली. न्यूज-1 च्या वृत्तानुसार, अकरम सैफी बीसीसीआयच्या ग्रुप बेस्ड टीममध्ये क्रिकेटर्सला समाविष्ट करण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा सुद्धा पुरवठा करतो. सोबतच, त्याच्या एका संवादाची ऑडिओ क्लिप सुद्धा जारी करण्यात आली आहे. 


काय आहे ऑडिओ टेपमध्ये..?
चॅनलने प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अकरम सैफी आणि नवोदित क्रिकेटर राहुल शर्मा यांच्यातील मोबाईल संवाद आहे. यात अकरमने कथितरित्या म्हटले, की टीममध्ये जागा हवी असेल तर एका तरुणीचा बंदोबस्त कर आणि दिल्लीतील फाइव्ह स्टार हॉटेलच्या खोलीत पाठव. यानंतर काही सामन्यांसाठी त्याची टीममध्ये निवड केली जाईल. चॅनलने इतर काही युवा खेळाडूंच्या प्रतिक्रिया सुद्धा दाखवल्या. त्यांनी सुद्धा अकरमवर पैसे मागून टीममध्ये घेण्याच्या प्रस्तावाचा खुलासा केला. यूपी क्रिकेट बोर्डमध्ये अकरम कुठल्याही पदावर नाही. तरीही तो अशा प्रकारची कामे करत राहतो. 


काय म्हणाला अकरम?
चॅनलने या आरोपांवर अकरमची प्रतिक्रिया सुद्धा घेतली. परंतु, अकरमने आपल्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले. "माझ्यावर आरोप लावणाऱ्या मुलाने एक तरुणी हॉटेलवर पाठवली असा दावा केला. त्याने लावलेल्या आरोपानुसार, जर त्याने मुलगी पाठवली असेल तर त्याची निवड व्हायला हवी होती. त्याची निवड झाली का, नाही ना! तो मला केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे." यानंतर चॅनलने राजीव शुक्ला यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...