आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • यूपी ATSचे एएसपी राजेश साहनी यांनी गोळी झाडून केली आत्महत्या IPS Officer Rajesh Sahni Found Dead Under Mysterious Circumstances At The ATS Office

यूपी ATSचे एएसपी राजेश साहनी यांची गोळी झाडून आत्महत्या, दहशतवाद्यांविरुद्ध अनेक मोहिमांचे नेतृत्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेश ATS चे अॅडिशनल एसपी राजेश साहनी यांनी मंगळवारी सर्व्हिस पिस्टलमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. एडीजी (कायदा व सुव्यवस्था) आनंद कुमार म्हणाले की, एटीएस मुख्यालयातील साहनी यांच्या रूममध्ये पोलिस पथक गेल्यावर त्यांना तेथे साहनी जमिनीवर पडलेले आढळले, त्यांच्या डोक्यात गोळी झाडलेली होती. ही घटना दुपारी 1 वाजेदरम्यान घडली. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट आढळलेली नाही. आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू आहे. तथापि, एटीएसमध्ये कार्यरत असताना साहनी यांनी दहशतवाद्यांविरुद्ध अनेक मोठ्या मोहिमांचे नेतृत्व केले होते.

 

आयएसआय एजंटला जेरबंद केले
- उत्तर प्रदेश पोलिसांत राजेश साहनी हे निवडक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. ते 23 मे रोजी आयएसआय एजंटला उत्तराखंड येथून अटक करणाऱ्या पथकात सामील होते. याशिवाय ATS मध्ये राहताना साहनी यांनी अनेक मोठ्या मोहिमा यशस्वी केल्या होत्या.

- तथापि, राजेश साहनी 1992 मध्ये पीपीएस सेवेत सहभागी झाले होते. 2013 मध्ये ते अॅडिशनल एसपीच्या पदावर प्रमोट झाले होते. 2014 पासून एटीएससोबत काम करत होते. सध्या ते ATS मुख्यालयात कार्यरत होते.

 

एएसपी साहनी यांनी ड्रायव्हरकडून मागवली पिस्तूल
- पोलिस सूत्रांनी सांगितले की, साहनी हे 11.30 वाजता ऑफिसमध्ये आले होते. त्यांनी ड्रायव्हरकडून पिस्तूल मागवली आणि गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी हा निर्णय का घेतला, याबद्दल अजून कोणताही सुगावा लागलेला नाही.

 

राजेश साहनी यांच्या चर्चित केसेस
- 23 मे 2018 रोजी साहनी यांनी उत्तराखंड मिलिटरी इंटेलिजेंस आणि उत्तराखंड पोलिसांसोबत मिळून आयएसआय एजंट रमेश सिंहला अटक केली होती.
- साहनी दीर्घकाळापासून दहशतवाद्यांच्या स्लीपर मॉड्युलविरुद्ध काम करत होते. मार्च 2016 मध्ये लखनऊत खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेचे त्यांनीच नेतृत्व केले होते.


पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...  

 

बातम्या आणखी आहेत...