आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतन्याहूंनी सपत्नीक पाहिला ताजमहाल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते सोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा - इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू मंगळवारी ऐतिहासिक ताजमहाल पाहाण्यासाठी जाणार आहे. आग्र्यात नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांचे स्वागत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करणार आहेत. नेतन्याहूंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आग्रा येथे कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोमवारी नेतन्याहू आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी संरक्षण, सायबर सेक्यूरिटीसह 9 करार झाले. मोदींनी इस्त्रायली कंपनीला भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत नेत्याहू यांनी नरेंद्र मोदींना क्रांतिकारी नेते म्हटले. त्यासोबतच त्यांचे भाषण म्हणजे रॉक कॉन्सर्ट सारखे असल्याचेही नेतन्याहू म्हणाले. 

 

नेतन्याहूंना योगींचे दुपारच्या भोजनाचे निमंत्रण 
- नेतन्याहू सकाळी 10.45 वाजता आग्रा येथे पोहोचले. योगींनी त्यांचे स्वागत केले. यानंतर नेतन्याहू ओबेरॉय अमर विलास हॉटल येथे गेल आणि तिथून ते ताजमहाल पाहाण्यासाठी रवाना झाले. यावेळी त्यांची पत्नी सारा त्यांच्यासोबत होत्या. 
- ताजमहाल पाहिल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी इस्त्रायल पंतप्रधानांसाठी लंचचे आयोजन केले आहे. साधारण दुपारी 3 वाजता नेतन्याहू आग्रा येथून दिल्लीला रवाना होतील. 
- नेतन्याहू ताजमहाल पाहायला येत असल्याने आग्रामध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी विमानतळ ते ताजमहाल पर्यंतच्या परिसराची कडक चेकिंग करण्यात आली. हॉटेलमध्ये थांबलेल्या टुरिस्टची माहिती गोळा करण्यात आली आहे. हॉटेल आणि आसपासच्या इमारतींच्या छतावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. 

 

 

संरक्षणविरहित व्यवसाय 20 पट वाढला
इस्रायल- भारत द्विपक्षीय संबंध 1992 मध्ये सुरू. तेव्हा संरक्षण क्षेत्र वगळता व्यवसाय 1300 कोटी रुपयांचा झाला होता. संरक्षण विरहित व्यवसाय 2017 पर्यंत 20 पट वाढून वार्षिक 25 हजार कोटी रुपयापर्यंत पोहोचला. इस्रायल भारताचा 10 वा सर्वात मोठा व्यावसायिक देश आहे. 2014 मध्ये इस्रायलकडून 30 हजार कोटींचे शस्त्र खरेदी केले. 2017 मध्ये भारताने इस्रायलशी 13 हजार कोटींचा लष्करी करार केला. 

 

भारताच्या विरोधाचा परिणाम नाही
नेतन्याहू यांनी भारत-इस्रायल संबंधास “स्वर्गात जमलेली जोडी’ असल्याचे सांगत म्हटले की, संयुक्त राष्ट्रात जेरुसलेम मुद्द्यावर भारताने इस्रायलविरुद्ध मत दिल्याने त्यांच्या देशाची निराशा झाली. मात्र, यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर फरक पडणार नाही. नेतन्याहू म्हणाले, नैसर्गिकरित्या आम्ही निराश झालो. मात्र,आमच्यातील संबंध अनेक आघाडीवर पुढे जात आहेत हे या यात्रेतून दिसते.

 

वर्ल्ड मीडिया; रद्द झालेला 3.2 हजार काेटींचा करार पुन्हा हाेऊ शकताे

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारतासाेबत नात्याच्या एका नव्या पर्वाला प्रारंभ केला अाहे. भारताने नुकताच रद्द केलेला 3.2 हजार काेटींचा संरक्षण करार या दाैऱ्यामुळे पुन्हा हाेऊ शकताे. या वेळी नेतन्याहू व माेदी यांच्यात गाढ मैत्रीची झलकही दिसली. दाेघांनी अनेकदा एकमेकांना ‘मित्र’ संबोधले.


द नेशन- इस्रायलचे पंतप्रधान भारत दाैऱ्यावर अाहेत. ते १२५हून अधिक व्यावसायिक प्रतिनिधींसह भारताच्या दाैऱ्यावर गेले अाहेत. त्यांनी भारताने युनोत जेरूसलेमला राजधानीचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाविराेधात मत दिल्याने नाराजी व्यक्त केली.


बीबीसी- गतवर्षी पंतप्रधान माेदींनी इस्रायल दाैऱ्यात तेथील नागरिकांच्या मनावर ठसा उमटवला हाेता. मात्र, डिसेंबर 2017मध्ये संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प हे जेव्हा जेरूसलेमला इस्रायलच्या राजधानीचा दर्जा देणारा प्रस्ताव घेऊन अाले असता, भारताने याविराेधात मत टाकले. यामुळे इस्रायली नागरिक नाराज अाहेत.

बातम्या आणखी आहेत...