आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISRO सॅटेलाइट सोडण्याचे 12 जानेवारीला करणार शतक, एकाचवेळी 31चे होणार लाँचिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु - इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्त्रो) शुक्रवारी स्वतः बनवलेले 100वे सॅटेलाइट लाँच करणार आहे. याशिवाय इस्त्रो या सिंगल मिशनने आणखी 30 सॅटेलाइट प्रक्षेपित करणार आहे. यातील 28 विदेशातील असतील. एवढ्या मोठ्या संख्येने सॅटेलाइट लाँच करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी इस्त्रोने 104 सॅटेलाइट एकाचवेळी अंतराळात सोडून विक्रम केला होता. यातीलही बहूतेक विदेशी होते. 

 

सकाळी 9.28 ला होणार लाँचिंग 
- श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून शुक्रवारी सकाळी 9.28 वाजता हे सॅटेलाइट लाँच होतील. 
- इस्त्रोचे डायरेक्टर एम. अन्नादुराई यांनी सांगितले, 'पीएसएलव्ही-सी20 पासून वेगळे होऊन हे सॅटेलाइट अंतराळात जाईल तेव्हा या मिशनचे आमचे 100 वे सॅटेलाइट असेल. हे आमचे पहिले शतक असेल. आम्हा त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहोत.'

 

भारताचे 3 सॅटेलाइट अंतराळात सोडले जाणार 
- अन्नादुराई म्हणाले, या मिशन अंतर्गत एकून 31 सॅटेलाइट सोडले जाणार आहेत. यातील मुख्य पे-लोट कार्टोसेट सीरिजचे तिसरे सॅटेलाइट असेल. उर्वरित 28 हे विदेशी सॅटेलाइट असणार आहेत. भारताचे तिसरे सॅटेलाइट हे मायक्रो सॅटेलाइट असेल. त्याचे वजन 100 किलोग्रॅम आहे. हे सर्वात शेवटी ऑर्बिटमध्ये जाईल. 

 

31 सॅटेलाइट 1323 किलो वजनाचे, अर्धे वजन कार्टोसेटचे 
- या मिशनमध्ये पीएसएलव्ही-सी40 एकूण 1323 किलोग्रॅम वजनाचे सॅटेलाइट घेऊन जाणार आहे.
- यातील कार्टोसेट-2 चे वजन 710 किलो आहे, उर्वरित 30 सॅटेलाइटचे वजन 613 किलोग्रॅम आहे. 

6 देशांचे आहेत 28 सॅटेलाइट 
- कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, रिपब्लिक ऑफ कोरिया, यूके आणि यूएसए या सहा देशांचे 28 सॅटेलाइट भारतातून लाँच होणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...